राजधानीत “वीर बाल दिवस” निमित्त बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या शौर्याला अभिवादन

नवी दिल्ली :- शिखांचे दहावे गुरु, गुरु गोबिंदसिंग यांचे सुपुत्र बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या अतुलनीय शौर्याला समर्पित ‘वीर बाल दिवस’ निमित्त या शौर्य सुपुत्रांना राजधानीत अभिवादन करण्यात आले.

कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्रीमती नीवा जैन, निवासी आयुक्त (अ.का.) यांनी बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात “वीर बाल दिवस” निमित्त बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या शौर्याला अभिवादन

वीर बाल दिवस निमित्त बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या अतुलनीय शौर्याला महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनीही वीर बालकांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून त्यांच्या त्याग व शौर्य यांचे स्मरण केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नरेडको विदर्भ 3 जनवरी 2025 से 5 जनवरी 2025 तक चिटनवीस सेंटर में 3-दिवसीय 'होमथॉन 2.0' की मेजबानी करने के लिए तैयार है।

Thu Dec 26 , 2024
नागपूर :- नेशनल रियल एस्टेट डेवलपमेंट काउंसिल (NAREDCO), विदर्भ चैप्टर 3 जनवरी से 5 जनवरी 2025 तक शहर चितनवीस सेंटर, सिविल लाइंस, नागपुर में अपनी पहली रियल एस्टेट प्रदर्शनी- ‘होमथॉन 2.0’ की मेजबानी करने के लिए पूरी तरह तैयार है। तीन दिवसीय प्रदर्शनी विदर्भ में 75+ बिल्डर्स और डेवलपर्स लाएगी, माननीय प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी के ‘सभी के लिए […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!