महापरिनिर्वाण दिनानिमित्त ’महामानवा’ला अभिवादन

– भदंत सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना

– भीम स्मृतीचे सामूहिक वाचन

नागपूर :- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत दीक्षाभूमी येथे बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. उपस्थित अनुयायांनी स्तुपाच्या आत बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेतले. यावेळी भीम स्मृतीचे सामुहिक वाचन करण्यात आले. समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

याप्रसंगी दीक्षाभूमी स्मारक समितीचे डॉ. राजेंद्र गवई, डॉ. सुधीर फुलझेले, आनंद फुलझेले, एन. आर. सुटे, विलास गजघाटे, प्राचार्या भुवनेश्वरी मेहेरे, प्राध्यापक उपस्थित होते. तत्पूर्वी ससाई यांच्या उपस्थितीत इंदोरा बुद्ध विहार, संविधान चौक आणि विमानतळ परिसरातील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अपर्ण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भंते प्रज्ञा बोधी, भंते भीमा बोधी, भंते धम्म बोधी, भंते नागसेन, भंते नागवंश, भंते महानामा, भंते राहूल, भंते मिलिंद, भंते धम्मविजय, भंते धम्मदीप, भंते धम्मप्रकाश, भंते कश्यप, भिक्खूनी संघप्रिया, विशाखा, गौतमी यांच्यासह भिक्खूसंघ, उपासक उपासिका उपस्थित होते.

बुधवारी सकाळपासूनच अनुयायांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून संविधान चौक आणि दीक्षाभूमी येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. याशिवाय शहरातील विविध शासकीय, निमशासकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था-संघटना, राजकीय पक्ष, बुद्ध विहार कमिटीतर्फे पुष्पमाला अपर्ण करून अभिवादन करण्यात आले. सकाळी भीम सैनिकांची गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान संविधान चौकात बुध्द आंबेडकरी साहित्य विक्रीच्या स्टालवर सकाळी गर्दी होती. भीम संघटनेतर्फे अनुयायांसाठी अल्पोहार, चहाचे वाटप करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Australian universities to open campuses in India soon: Margaret Gardner

Thu Dec 7 , 2023
Mumbai :-Stating that most of the students coming to Australia for higher education from India come to the state of Victoria, the Governor of Victoria Prof. By Margaret Gardner said Australia’s universities are also in the process of starting their campuses in India. Governor Prof. Margaret Gardner along with a delegation from the state of Victoria was speaking to Maharashtra […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com