संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 10 :- कामठी तालुक्यातील आजनी येथील सावित्रीबाई जोतीराव फुले अभ्यासिका आणि वाचनालयात शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांना तिथी प्रमाणे असलेल्या जयंती निमित्त मानाचा मुजरा करण्यात आला आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
प्रमुख अतिथी सरस्वती कॉन्व्हेन्टच्या मुख्याध्यापिका भारती वाट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.तर गजेंद्र भाऊ वाट यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
यावेळी लिलाधर दवंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर मृणाल वाट हिने सावित्रीबाई यांच्या विषयी थोडक्यात माहिती दिली. आभार प्रदर्शन सुहानी फुकट हीने केले.
याप्रसंगी प्रतिभा दवंडे, राजकुमार दवंडे, निखिल विघे, राहुल ढोक, कौस्तुभ वाट, शिल्पा वाट आदी मान्यवरांसह मृणाल ठाकरे, खुशबू फुकट, सृष्टी दवंडे, प्रियंका घोडे, सुचिता वानखेडे, गुंजन वानखेडे, संस्कृती गौतम, संस्कृती फुकट, शितल हरणे, तृप्ती हिवरकर, तन्मय वाणी, साहिल गुरफोडे, अर्पित खेवले, निहाल झाडे, ओंकार नवघरे, कार्तिक दवंडे, गौरव लाहाबर, आदी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.