-विभागातील अडीच हजार कर्मचारी सुखावले
-एकमेकांना दिल्या शेभेच्छा
नागपूर :- एसटी कामगारांच्या पगारासाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेतर्फे याचीका दाखल केल्यानंतर कर्मचार्यांचे पगार त्वरीत करण्यासंबधीचे आदेश काढण्यात आले. तशा सूचना देखिल देण्यात आल्या. त्यामुळे नागपूर विभागातील कर्मचार्यांच्या जानेवारीच्या वेतनाचा प्रश्न सुटला असून शुक्रवारी पगार होईल. यावृत्तामुळे नागपूर विभागातील 2 हजार 600 कर्मचार्यांना आनंदाचे वातावरण होते.
जानेवारी अर्ध्यावर आल्यानंतरही कर्मचार्यांच्या पगारासंबधी कुठलीच हालचाल नव्हती. त्यामुळे मान्यताप्राप्त संघटनेने 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत कामगारांना वेतन न मिळाल्यास तातडीने वेतन द्यावे, अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचीका दाखल करावी लागेल अशी नोटीस बजावलेली होती तसेच जर 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत वेतन न झाल्यास गुरूवारी ‘फौजदारी स्वरूपाची’ अवमान याचीका दाखल करण्यात येणार आहे असा ईशारा देखील दिला होता.
ईशारा दिल्यानंतर शासन व प्रशासनात त्वरित महत्वपूर्ण बैठक घेऊन कर्मचार्यांच्या पगारासाठी तूर्त 223 कोटी रुपयांची तरतूद केली गेली. त्यामुळे नागपूर विभागातील 2 हजार 600 कर्मचार्यांचे शुक्रवार 17 फेब्रुवारी रोजी पगार होतील. पगारासाठीची रक्कम जमा केल्याचे वृत्त येताच कर्मचार्यांत आनंदाची लाट उसळली. त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
पगार त्वरित करण्यासंबंधीचे आदेश
भविष्यात पगाराचा प्रश्न पुन्हा उद्भवू नये यासाठी 15 फेब्रुवारी रोजी मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या अल्टीमेटम नुसार कामगार न्यायालय (मुंबई) येथे अवमान याचिका दाखल करण्यात आली. संघटनेने दाखल केलेल्या या याचिकेनंतर कर्मचार्यांचे पगार त्वरित करण्यासंबंधीचे आदेश काढण्यात आले असून तशा सूचना देखील प्रसारित झाल्या आहे.
न्यायालयात अवमान याचीका
जानेवारीच्या पगाराचा प्रश्न सुटला, परंतू पुढे काय? न्यायालयाचा आदेश असतांना सुध्दा पगार देय तारखेस झाला नाही पुन्हा पगाराचा प्रश्न निर्मान होऊ नये या साठी कामगार न्यायालयात अवमान याचीका एस टी कामगार संघटने द्वारे करण्यात आली.
– अजय हट्टेवार
राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना
@ फाईल फोटो