संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- रामाजी पोटभरे (पाटील) यांच्या कांद्री येथील शेतातील श्री भगवान देवाच्या मंदिरात पुजा अर्चना व हरिभजन करून आपल्या परिसरात पाऊस चांगला येऊन सर्वाना धन, धान्य व सुखी समृध्दी जीवन लाभावे यास्तव देवाला साकडे घालण्यात आले.
कांद्री येथील रामाजी पोटभरे (पाटील) यांच्या शेतातील श्री भगवान देवाचे मंदिर असुन गावातील बहुतेक लोकांचे ते आराध्य देव आहे. भाविक भक्त व्दारे बुधवार (दि.२) ऑगस्ट ला सायंकाळी ७ वाजता पुजा अर्चना करून श्री गजानन भजन मंडळ कांद्री प्रमुख फजित बावने, धनराज क्षिरसागर, अरुन पोटभरे, सेवक गायकवाड़, ज्ञानेश्वर गि-हे, रविंद्र काबळे, शिवाजी चकोले, तब्बला मास्तर किष्णा पोटभरे, मारोती आष्टनकर, संकेत चकोले आदीने हरि भजन करून वामन देशमुख हयांनी मनोभावे प्राथना करून आपल्या परिसरात निसर्गाच्या कृपेने चांगला पाऊस पडुन शेती भरभरून पिकुन सर्वाना धन, धान्य सुखी समृध्दी जीवन लाभावे असे श्री भगवान देवाला साकडे घातले. याप्रसंगी कांद्रीचे माजी सरपंच बळवंत पडोळे, माजी ग्रा प सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, प्रतिष्ठीत नागरिक नरेश पोटभरे, जगन शेंदरे, राजहंस वंजारी, गणेश सरोदे, मानस झिंगरे, मंगलदास गेडाम, सुनिल बागडे, विजय देशमुख,आरव झिंगरे सह बहु संख्येने ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.