नागपूर :-स्थानिक स्पर्धेत जवाहर क्रिकेट अकॅडमी शिवनगर आयोजित १४ वर्ष वयोगटातील नॉकआऊट टुर्नामेंट मधे एस.बी.सिटी विरुद्ध पांढरकवडा स्पोर्टिंग क्लब दरम्यान सामना रंगला होता. एस.बी.सिटी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना पांढरकवडा स्पोर्टिंग क्लब संघासमोर जिंकण्यासाठी ३५ षटकामध्ये २९८ धावाचे लक्ष ठेवले होते. प्रथम फलंदाजी करतांना साईश भिसे यांनी तुफानी फटकेबाजी करताना नाबाद १२५ (८८) धावा काढल्या. त्याच्या फटकेबाजीत १३ चौकाराचा समावेश होता. आर्या धैर्य यांनी -१०६ धावा (९७) रिद्धेश -३५ (३०) धावा काढल्या. मिमोह मेश्राम याने २५ धावाच्या बदल्यात ३ गडी बाद केले. प्रत्तुरात पांढरकवडा स्पोर्टिंग क्लब यांनी धावांचा पाठलाग करतांना ३५ षटकामध्ये १२४ धावावर ८ गडी बाद झाले. पांढरकवडा स्पोर्टिंग क्लब संघाकडून साई किरण यांनी सर्वाधिक ५० (५८) धावा काढल्या. सरतेशेवटी एस.बी.सिटी संघ १७३ धावांनी विजयी झाला. सामनावीर म्हणून साईश भिसे यांना बक्षीस देण्यात आले. ह्या टुर्नामेंट मधे अमरावती आणि पांढरकवडा येथील संघांनी भाग घेतला आहे. सतपाल ठाकूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि प्रशिक्षिकाची भूमिका बजावली. विजयाबद्दल एस.बी.सिटीचे मनीष मिश्रा शतकवीर साईश भिसे आणि धर्य आर्या यांचे अभिनंदन केले.
जवाहर क्रिकेट लीग टुर्नामेंट मध्ये साईश भिसेच्या नाबाद १२५ धावा.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com