

गुरूवार (दि.१७) मार्च ला साईनाथ विद्यालय बोरडा येथे होळी दहन कार्यक्रमाचे आयोजन मुख्या ध्यापक विनोद रच्छोरे, शिक्षक बावनकुळे सर, हुमणे सर, वस्ताद क्रिष्णाजी मरसकोल्हे खेडी, मास्टर मोहन वकलकार निमखेडा, निलेश गाढवे, राजेंद्र सांभारे खेडी, गंगाधर नागपुरे खेडी आदीच्या उपस्थित करून मान्यवरांच्या हस्ते परमात्मा दांड पटटा, अखाडा निम खेडा येथील चंमुनी १६ वी आष्टे डु मर्दानी आखाडा चैम्पियनशिप नागपुर येथे प्राविण्य मिळविलेल्या १) अल्केश वकलकार ( गोल्ड मेडल ) २) प्रतिक सांभारे ( गोल्ड मेडल ) ३) प्रांकेत नागपुरे (गोल्ड मेडल) ४) गौरव बावणे (सिल्वर मेडल) ५) प्रणव नागपुरे ( सिल्व र मेडल ) ६) कु साक्षी सुर्यवंशी ( सिल्वर मेडल ) ७) उर्वशी मलेवार ( गोल्ड मेडल) ८) सावी वकलकार ( गोल्ड मेडल ) ९) समिक्षा नागपुरे ( गोल्ड मेडल) १०) श्रावणी ठाकरे (सिल्वर मेडल) या विद्यार्थ्याचा सत्कार करून प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तदंनतर होळी दहन करून सगळ्यांना होळी च्या शुभेच्छा देण्यात आल्या. 
