कोदामेंढी :- येथील साईबाबा ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण वार्षिक सभा नुकतीच घेण्यात आली. त्यानिमित्ताने येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी व बारावीत प्रथम व द्वितीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या ट्रॉफी व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला .गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये दहाव्या वर्गातून प्रथम येणारी ऐश्वर्या गुणवंता तलमले, गुंजन विनोद गजघाटे ,द्वितीय येणारी अदिती सुरेश धुळमे, जानवी नरेश हटवार तर बाराव्या वर्गात प्रथम येणारी विशाखा अनिल सपाटे ,द्वितीय येणारी सुहानी राजेश मोहूर्ले यांच्या समावेश आहे .याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अशोक हटवार, अध्यक्ष बाळकृष्ण पंचभाई, संचालक श्याम देवतळे ,वसुराज पात्रे ,नरेश मेश्राम, शिवराम बावनकुळे ,शकुंतला हटवार, आशा बावनकुळे, उपसरपंच गोपाल गिरमेकर ,व्यवस्थापक भैय्या बावनकुळे ,ऑपरेटर तरुण गजभिये ,सुशील खंडाळे, अर्चना निकुरे ,राजकुमार बावनकुळे, सुभाष बावनकुळे ,अनिल ढोमणे, सुनील आरभी, मगन बावनकुळे , कवडू बारई,सुरेंद्र तांबुलकर ,संजय पडोळे ,सरिता जेंगठे,मंगेश बावनकुळे ,रत्नकला पडोळे ,नरेश हटवार ,गजेंद्र तांबुलकर ,मंदा बावनकुळे, सुधाकर वंजारी ,वैभव हटवार सह सभासदगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साईबाबा पतसंस्थेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com