संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- राजकारण आणि सहकार क्षेत्रात स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्या सहकार महर्षीं बाबासाहेब केदार यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात माजी जी. प. अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या मुख्य उपस्थितीत सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी माजी जी. प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी सांगितले की आंमचे प्रेरणास्रोत दिवंगत सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांनी राजकरणात तसेच सहकार क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वातून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे .सहकार महर्षी दादासाहेब केदार यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथे १५ नोव्हेंबर १९२८ मध्ये झाला.
ते पदवीधर होते. विद्यार्थीदशेपासूनच त्यांचा समाजकार्यात सक्रिय सहभाग होता.काँग्रेस नेते दादासाहेब कन्नमवार यांच्या संपर्कात आल्यावर त्यांची काँग्रेसमध्ये राजकीय कारकीर्द सुरू झाली. नागपूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असणार्या काँग्रेस नेत्यांपैकी ते एक होते. १९५४ ते ५७ या काळात सावनेर तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते. १९६२ मध्ये ते जि.प.वर निवडून गेले. त्याच वर्षी त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही मिळाले. नागपूर जिल्हा परिषदेचे ते पहिले अध्यक्ष होते. १९६२ ते ७५ असे १५ वर्षे त्यांनी हे पद भूषविले. १९९0 मध्ये ते कळमेश्वर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांचा ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. नागपूरचे पालकमंत्रिपदही त्यांच्याकडे होते.
राजकारणासोबतच त्यांचे सहकार क्षेत्रातही मोठे योगदान होते. नागपूर जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाचे संस्थापक अध्यक्ष, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक अध्यक्ष, राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे अध्यक्ष, हिंगण्यातील सूत गिरणीचे अध्यक्ष, विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना राज्य वस्त्रोद्योग महासंघातर्फे ‘वस्त्रोद्योगमहर्षी’ या उपाधीने गौरविण्यात आले होते.
कळमन्यातील बाजार समितीचे मार्केट यार्ड हे त्यांच्या सहकार क्षेत्रातील जाणतेपणाचे उदाहरण मानले जाते. पूर्वी हे यार्ड हिेंगणा आणि नागपूर, कामठी तालुक्यासाठी तयार करण्यात आले होते. आता ते देशातील विशाल आणि व्यवस्थापनबद्ध पद्धतीने चालणारे यार्ड म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी ३00 कोटींपेक्षा अधिक रकमेची उलाढाल होते.
सहकार क्षेत्रातील कार्यप्रवण नेते विदर्भातील सहकार महर्षी. राजकारणातील अग्रगण्य नेते बाबासाहेब केदार यांच्या निधनाने सहकार क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले आहे. सहकाराची चळवळ अधिक प्रभावी करण्यात आणि शेतकर्यांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेब केदार यांनी दिलेले योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे.शेतकरी कुटुंबातून आलेला एक शिस्तप्रिय, प्रामाणिक, सुशिक्षित आणि निष्ठावंत तरुण म्हणून बाबासाहेबांना बॅ. शेषराव वानखेडे यांनी हेरले आणि राजकारणात आणले.
बाबासाहेबांची जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि तिथे त्यांच्या कामाची चुणूक पाहायला मिळाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ज्या ज्या क्षेत्रात बाबासाहेबांनी काम केले त्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. सहकार क्षेत्रातील अनेक संस्था तोट्यात चालत असतानाच्या काळात बाबासाहेबांनी ज्या संस्थांची धुरा हातात घेतली त्या संस्थांचा कायापालट केला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक हे मान्यवर त्यांच्या कामावर प्रसन्न होते. जातिभेदाचा विचार न करता सर्व समाजातील कार्यकर्त्यांंना घेऊन चालणारे एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याबद्दल सर्वांंनाच आदर होता असे मौलिक मत व्यक्त केले.
याप्रसंगी कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत शहाणे,कामठी पंचायत समिती सभापती दिशा चणकापुरे, उपसभापती कुणाल इटकेलवार, समितीचे संचालक सर्वश्री सुधीर शहाणे,कृष्णा करडभाजने,सूर्यभान करडभाजने, नवल किशोर डडमल, सच्चेलाल घोडमारे,राजू भालेराव,सोनू ताई कुथे पंचायत समिती सदस्य, सुमेध रंगारी पंचायत समिती सदस्य,नामदेव इंगोले,किशोर धांडे,अनंता वाघ, देवेंद्र येन्डे, प्रवीण कुथे, प्रकाश गजभिये, पांडुरंग भगत,निखिल फलके, विजय घोडके,रमेश कडू,अमोल निधान,होमराज गोरले, विनोद शहाणे,अतुल चौधरी,ज्ञानेश्वर इंगोले,मंगेश जगताप,नाना झाडे, पंकज कुथे,सुनील चलपे तसेच समितीचे सर्व कर्मचारी प्रामुख्याने हजर होते.