संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 18 :- 31 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार 20 ऑगस्ट 2022 रोजी सद्भभावना दिवस प्रतिज्ञा घेणे व माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे तथापि युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांनी दिनांक 12 ऑगस्ट 2022 च्या पत्रावर दिनांक 20 ऑगस्ट 2022 ऐवजी 18 ऑगस्ट 2022 रोजी सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेणे व माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचे शासन निर्णय दिल्याने या शासन निर्णयानुसार कामठी तालुक्यातील समस्त शासकीय कार्यालयात 20 ऑगस्ट ऐवजी आज 18 ऑगस्ट ला सदभावना दिवस सामूहिक शपथ घेण्यात आली .
यानुसार कामठी तहसील कार्यालयात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या हस्ते माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात आले तसेच तहसील कार्यालयीन अधिकारी कर्मचारी च्या उपस्थितीत सदभावना दिवस प्रतिज्ञा घेण्यात आली.याप्रसंगी नायब तहसीलदार राजीव बमनोटे,नायब तहसीलदार अमर हांडा, प्रस्तुतकार अमोल पौड, वरीष्ठ लीपिक वसुंधरा मांनवटकर, निमकर, सुधीर चव्हाण,राम उरकुडे आदी उपस्थित होते.
कामठी नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी संदीप बोरकर, उपमुख्याधिकारी नितीन चव्हाण यांच्या मुख्य उपस्थितीत सदभावना शपथ घेण्यात आली.याप्रसंगी आबासाहेब मुंडे,विक्रम चव्हाण, मंगेश लाडे, वाडेकर,प्रदीप भोकरे, पूजा राऊत, शीतल, अदमने,गायत्री शेंदरे,कौशल्या शर्मा, हाडोती मॅडम,अवि चौधरी,नरेशचंद्र कलसे, अनमोल मेश्राम, विकास यादव,दीपक जैस्वाल,उकेश मेथीयां, विजय मस्के आदी उपस्थित होते.
कामठी पंचायत समिती कार्यालयात बीडीओ अंशुजा गराटे यांच्या हस्ते माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन वाहून सदभावना शपथ घेण्यात आली.याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले, विस्तार अधिकारी शशिकांत डाखोळे , गोपीचंद कातुरे, मनीष दिघाडे आदी उपस्थित होते.यासह आदी शासकीय कार्यालयात सदभावना शपथ घेण्यात आली.