संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी – एस. के. पोरवाल कनिष्ठ महाविद्यालय, कामठी येथे कुस्तीपटूनी तालुका स्तरावर विजय संपादन केला आहे. या कुस्ती पटूची निवड जिल्हास्तरीय कुस्तीस्पर्धेसाठी करण्यात आली आहे. कामठी येथील निम्बाजी उस्ताद आखाडा येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सात कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध वजन गटामध्ये भाग घेतला होता. सतरा वर्षातील वजन गटामध्ये समीर राजेंद्र महल्ले 62 किलो वजन गटात आणि 19 वर्ष गटामध्ये अनिकेत श्याम यादव 65 किलो वजन गटात या दोन्ही कुस्ती पटूनी विजय संपादन केला.
एस. के. पोरवाल कॉलेजच्या क्रीडा शिक्षिका तसेच तालुका क्रीडा अधिकारी प्राध्यापिका मल्लिका नागपुरे उपस्थित होत्या. तसेच शिक्षक सहकारी महाविद्यालयाचे प्राचार्य आशिष यादव सर व तेजस्विनी विद्यालय, कोरडीचे क्रीडा शिक्षक या सर्वांनी विजेत्या कुस्तीपटूचे अभिनंदन केले.