संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-कामठी तालुक्यातील 41 शाळांचा समावेश
-तालुक्यातील 400 विद्यार्थ्यांना 41 शाळेत मिळणार मोफत प्रवेश
कामठी :- शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत तालुक्यातील खाजगी शाळांमध्ये व त्याचप्रमाणे कामठी पंचायत समिती अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकासाठी राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवरील ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ आज 1 मार्च पासून झाला असून 17 मार्च शेवटची दिनांक आहे. त्यानुसार कामठी तालुक्यातील 41 शाळांमध्ये 400 विद्यार्थ्यांना ‘आरटीई ‘ अंतर्गत प्रवेश मिळणार आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना नामांकित खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश करण्याची या माध्यमातून संधी प्राप्त होत असते त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेची पालक प्रतीक्षा करीत होते मात्र या प्रतिक्षेला विराम मिळाला असून आजपासून आरटीई ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आर टी ई अंतर्गत प्रवेश मिळणाऱ्या कामठी तालुक्यातील या 41 शाळांमध्ये सेंट डॉन बॉस्को ज्याकब स्कुल,भिलगाव, माऊंट लिटेरा झी स्कुल भिलगाव,बी एस एस प्रणवनंदा एकेडमी, एम डी पब्लिक स्कुल म्हसाळा,विद्यामंदिर कोराडी, प्रगती कॉन्व्हेंट कोराडी,ब्राईट स्कॉलर्स स्कुल कोराडी,भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिर कोराडी,तेजस्विनी विद्या मंदिर स्कुल कोराडी,नवजीवन इंग्लिश स्कुल लोंनखैरी,संनराईज कॉन्व्हेंट महादुला, तायवाडे पब्लिक स्कुल,भांगे पब्लिक स्कुल पांजरा,स्पंदन कॉन्व्हेंट महालगाव ,ब्लोजम स्कुल,हिरांजल पब्लिक स्कुल भोवरी,प्रियंती इंग्लिश स्कुल,नित्यानंद इंग्लिश कॉन्व्हेंट, टर्निंग पॉईंट पब्लिक कोन्व्हेन्ट खेडी,ई लाईट पब्लिक स्कुल तरोडी,गुरुकुल इंग्लिश स्कुल वडोदा,अद्वय पब्लिक स्कुल वडोदा,श्री जयवंतराव वंजारी ज्युनियर कॉलेज वडोदा,श्री स्वामींनारायन गुरुकुल इंटरनॅशनल स्कुल,आयडियल कोन्व्हेन्ट गुमथळा, लिटल स्टार कोन्व्हेन्ट गुमथळा,ऑरेंज सिटी स्कुल येरखेडा, सरस्वती कोन्व्हेन्ट आजनी,सेंट जीनेली कोन्व्हेन्ट आजनी,रुक्मिणी स्कुल शिरपूर,ब्लू बेल्स कॉन्व्हेंट कामठी,माँ शारदा ज्ञान मंदिर,स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कुल,खोब्रागडे प्राथमिक स्कुल कामठी,इंदिरा प्राथमिक स्कुल कामठी, सरस्वती कोन्व्हेन्ट कामठी,जानव्ही कोन्व्हेन्ट कामठी,कॅन्टोन्मेंट बोर्ड इंग्लिश प्राथमिक स्कुल कामठी,सरस्वती शिशु मंदिर प्राथमिक शाळा कामठी,रामकृष्ण शारदा मिशन, नवकार पब्लिक स्कुल कामठी चा समावेश आहे.
आरटीई अंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधील मुलांना खासगी शाळांमध्ये निशुल्क प्रवेश मिळणार या हेतूने पालकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रवेशासाठी लागणार ही कागदपत्रे
—रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज किंवा टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स देयक किंवा घरपट्टी , आधारकार्ड,मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, भाडे करार म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केल्याची प्रत आवश्यक आहे. जन्मतारखेचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा म्हणून सॅलरी स्लिप, तहसीलदाराचा दाखला, कंपनीचा दाखला,जात प्रमाणपत्र पुरावा,दिव्यांग मुलासाठी जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकिय अधीक्षक यांचे प्रमाणपत्र असावे.