चंद्रपूर :- चंद्रपूरच्या इंदिरानगर येथील रहिवासी पुरुषोत्तम बोपचे (वय 40 वर्षे) हे फुले वेचण्यासाठी जंगलात गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुरुषोत्तम बोपचे यांच्या कुटुंबीयांस शासन नियमानुसार मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वन विभागातर्फे पुरुषोत्तम बोपचे यांच्या कुटुंबास 5 लाख रुपयांचा धनादेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कारेकर, माजी उपमहापौर राहुल पावडे, देवराव भोंगळे, पप्पू बोपचे, आशिष ताजने आदी उपस्थित होते.
वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांस पाच लाख रुपयांची मदत, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते धनादेश प्रदान
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com