नागपूर : शहिद सैनिकांच्या अवलंबीतांच्या कुटूबियांचे पुनर्वसनासाठी , माजी सैनिक आणि अपंग सैनिक यांच्या योग्य पुनर्वसनासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला स्मार्टडाटा एंटरप्रायजेस इंडिया लिमीटेडचे ब्रँच ऑफिस सेझ मिहानचे ब्रँच हेड अलोक पांडे यांनी सि.एस.आर. फंडमधून ध्वजनिधी म्हणून जिल्हाधिकारी आर. विमला यांना दीड लाख रुपयाचा धनादेश दिला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी ध्वजनिधीचा धनादेश स्विकारतांना त्यांचे आभार व्यक्त करुन यामुळे सैनिकांचे मनोबल उंचावते व देशरक्षण करीत असतांना आपल्या पाठिशी संपूर्ण समाज उभा आहे, अशी भावना त्यांच्यात तयार होण्यास मदत होते.