कामठी :- पोलीस आयुक्त, नागपुर शहर, मा. सह पोलीस आयुक्त, नागपुर शहर, अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशीक विभाग) यांचे मार्गदर्शनात, आगामी लोकसभा निवडणुक २०२४ संबंधाने पोलीसांचा रूटमार्च व एरीया डॉमीनेशन परिमंडळ क. ०५, नागपुर शहर अंतर्गत पोलीस ठाणे नविन कामठी व जुनी कामठी हद्दीत शांतता व सुव्यवस्थेचे दृष्टीने तसेच, गुन्हेगारावर वचक वसावा याकरीता पोलीस उप आयुक्त परिमंडळ क. ५ यांचे उपस्थीत दिनांक ०५.०३.२०२४ चे २२.२० वा. ते २३.४५ वा. दरम्यान घेण्यात आला. सदर रूट मार्च व एरीया डॉमीनेशन हे १) पोलीस ठाणे नविन कामठी अंतर्गत ईस्माईलपूरा, जयभिम चौक, यादव नगर, जयस्तंभ चौक आणि २) पोलीस ठाणे जुनी कामठी अंतर्गत गोयल टॉकीज, शुक्रवारी बाजार तथा ईतर परीसर असा घेण्यात आला.
पोलीस उप आयुक्त परि. ५ यांनी सदर रूटमार्च व एरोया डॉमीनेशन दरम्यान स्पोकर वरून नागरीकांना आगामी लोकसभा निवडणुक २०२४ अनुषंगाने आवाहन करण्यात आले की, सदर मतदान प्रकीया सुरूळीत पार पाडण्याकरीता पोलीस प्रशासन हे पूर्णपणे सज्ज आहे. मतदान करणे हा सर्वाचा हक्क असुन, सदरचा हक्क बजवतांना जर कोणी आपल्यावर दवाव टाकत असेल, प्रलोभन देत असेल तर नजीकच्या पोलीस ठाण्यास कळवावे किंवा डायल क. ११२ यावर तक्रार दाखल करावी, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. सदरच्या आगामी निवडणुका हया भयमुक्त वातावरणात कशा पार पाडतील याबाबत पोलीस उप आयुक्त परि क. ५ यांनी मार्गदर्शन केले.
तसेच सदर रूट मार्च दरम्यान मा. पोलीस उप आयुक्त परि. ५ यांनी ठिकठिकाणी कॉर्नर मिटींग घेतल्या. कॉर्नर मिटींग मध्ये मोठ्या संखखेने महिला व इतर नागरीक हजर होते. यादरम्यान मा. पोलीस उप आयुक्त परि. ५ यांनी नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच, महिला बावत घडणारे गुन्हे, अयल ११२, सायवर काईम, आर्थिक गुन्हे, अवैध धंदे याबाबत जनतेस सविस्तर मार्गदर्शन केले. परीसरात लपून-छपुन अवैध धंदे करणाऱ्या इसमांची माहीती पोलीस ठाण्याला देण्याबाबत नागरीकांना आवाहन करण्यात आले. त्यासाठी पोलीस उप आयुक्त परिमंडळ क. ५ व ईतर अधिकान्यांनी आपापले संपर्क क्रमांक हे नागरीकांना देवुन त्यावर तकार देण्याबाबत आवाहन केले. संदर रूट मार्च व प्रीया डॉमीनेशन मध्ये बीरसागर सपोआ, कामठी विभाग तसेच, वपोनि, नविन कामठी व जुनी कामठी यांचेसह ईतर अधिकारी व अंमलदार आणि सि.आर. पी. एफ, वे दोन पाहुन सहभागी होते.