‘फिरते वाहना’ मुळे येणार लसीकरणाला गती

– आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते ‘फिरते वाहनाचा’ शुभारंभ

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग व लॉयन्स इंटरनॅशनलचे युनिट, लॉयन्स क्लब नागपूर कॉसमॉस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फिरते वाहनाचा’ (चालते फिरते लसीकरण पथक) मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते शुभारंभ झाला. बुधवारी (ता. २२) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत येथे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त विजया बनकर, लॉयन्स क्लब नागपूर कॉसमॉस पास्ट कौन्सिल चेअर पर्सन राजे मुधोजी भोसले यांनी या विशेष ‘फिरते वाहनाला’ (चालते फिरते लसीकरण पथक)हिरवी झेंडी दाखवली.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक बालकाच्या संपूर्ण लसीकरणाला गती देण्यासाठी मनपाद्वारे हा महत्वाचा पुढाकार घेण्यात आलेला आहे. सदर ‘फिरते वाहन’ शहरातील विविध वस्त्या, झोपडपट्टी भागांमध्ये जाऊन बालकांचे लसीकरण करेल.

‘फिरते वाहनाच्या’ लोकार्पण प्रसंगी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, प्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड, लॉयन्स क्लब नागपूर कॉसमॉस जीएटी एरिया लिडर विनोद वर्मा, इमिडीएट पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बलबीर सिंग विज, क्लब प्रेसिडेंट श्री. अनिल लांजेवार, सचिव आकाश, कोषाध्यक्ष राजा देहारीया, प्रकल्प संचालक मोहिंदर पालसिंग मान, पास्ट प्रेसिडेन्ट हरीश गुप्ता, पास्ट प्रेसिडेन्ट कवलजीत कौर विज, पास्ट ऍडिशनल सेक्रेटरी प्रमोद कानेटकर, बोर्ड मेंबर जसकीर्थ सिंग विज,जयंती पुनामिया (पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर), परविंदर सिंग विज (पास्ट प्रेसिडेंट गुरुद्वारा गुरु नानक दरबार) यांच्यासह मनपाचे झोनल वैद्यकीय अधिकारी, पी.एच. एन अर्चना खाडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

शहराच्या स्लम भागात राहणाऱ्यांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी याकरिता ‘फिरते वाहन’ (चालते फिरते लसीकरण पथक) ही विशेष सेवा नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. हे वाहन लायन्स क्लब नागपूर कॉसमॉस यांच्याकडून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे वाहन शहरात लसीकरणसपासून वंचित असलेल्या बालकांचे लसीकरण करण्याकरिता उत्तम कार्य करेल असा विश्वास आमदार प्रवीण दटके यांनी व्यक्त केला.

नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे चमू, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांचा या ‘फिरते वाहनामध्ये’ (चालते फिरते लसीकरण पथक) सहभाग असेल. मनपाकडून कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. या वाहनाचा उपयोग मुख्यतः शहरातील बालकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्याकरिता करण्यात येईल. ही चमू शहरातील सर्व झोनमध्ये व तसेच ‘हाय रिस्क एरिया’ मध्ये जाऊन लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांचे लसीकरण करेल. या वाहनामुळे लसीकरणात गती येईल आणि बालकांचे वेळेत लसीकरण होण्यास मदत होईल.

हे ‘फिरते वाहन’ (चालते फिरते लसीकरण पथक) झोननिहाय सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत लसीकरण मोहीम चालवतील. यामुळे बालकांचे ठिकठिकाणी जाऊन जास्तीत जास्त लसीकरण होण्यास मदत होईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जिल्ह्यातील ४१९११ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा गळती मदत जाहीर !  

Thu Jan 23 , 2025
– देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा !  – संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आ. देवेंद्र भुयार यांचे मानले आभार !  मोर्शी :- मोर्शी वरूड तालुक्यासह अमरावती जिल्ह्यामध्ये अतिरुष्टीमुळे व बुरशीजन्य रोगामुळे संत्रा व मोंसंबी फळ पिकांची जवळपास ६०% पेक्षा जास्त फळ गळती झाली तसेच कपाशी, सोयाबीन व इतर शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे पिक नुकसानीचे पंचनामे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!