रोल बॉल – महाराष्ट्र महिला संघ सुवर्ण पदक विजेता; पुरुष संघाला रौप्यपदक

पणजी :-श्वेता कदमच्या कुशल नेतृत्वासह महेक राऊत, अक्षता आणि स्नेहल पाटीलने उत्तम कामगिरी करत महाराष्ट्र महिला संघाला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रोल बॉलमधील सुवर्णपदकाचा बहुमान मिळवून दिला. पुरुष संघाला रौप्यपदक मिळाले.

महाराष्ट्र महिला संघाने अंतिम फेरीमध्ये राजस्थानचा ५-२ असा पराभव केला. महाराष्ट्र पुरुष संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. राजस्थान संघाने महाराष्ट्रावर ७-५ अशी मात केली.

*महिला संघाची कौतुकास्पद कामगिरी : प्रशिक्षक हेमांगिनी काळे*

महाराष्ट्र महिला संघाची यंदाच्या स्पर्धेतील कामगिरी कौतुकास्पद ठरली. यामुळेच संघाने आपली विजयी मोहीम कायम ठेवत अंतिम फेरी गाठली. यातही साजेशी कामगिरी करत संघाने विजय संपादन केला, अशा शब्दांत मुख्य प्रशिक्षक हेमागिंनी काळे यांनी संघाची प्रशंसा केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवयवदानासाठी जिल्हास्तरावर मोहीम राबविण्यात येणार – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

Fri Nov 3 , 2023
नागपूर :-  अवयवदान हे ईश्वरीय कार्य असून अवयवदानाची मोहीम राबविण्याची गरज आहे. जनजागृती हा घटकही अवयवदान मोहीमेसाठी महत्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बैठकीत सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज अवयव, देहदान विषयक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्यासह जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!