ग्रामरोजगार सेवकांचा टी.ए,डी.ए,दोन वर्षापुर्वीपासून प्रलंबित असल्याने सिरसोली येथील रोहयो ची कामे बंद – सरपंच विनोद कारेमोरे

कोदामेंढी :- अरोली-कोदामेंढी जि.प.क्षेत्र व कोदामेंढी पं.सं.क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गट ग्रा. पं.सिरसोली येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे बंद आहेत. येथील ग्राम रोजगार सेवक अरविंद मेश्राम यांच्यासह संपूर्ण मौदा तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचा प्रवासभत्ता व अल्पोहार भत्ता मागील दोन ते तीन वर्षापासून प्रलंबित असल्याने सिरसोली येथील ग्रामरोजगार सेवकाने कामे बंद केली आहेत.गावे समृद्ध करण्यासाठी रोहयो ची कामे सुरु असणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन ते तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला ग्रामरोजगार सेवकांचा टी.ए.,डी.ए.संबंधित रोहयो विभागाने त्वरित प्रदान करुन रोहयो ची कामे करावी, अशी मागणी गट ग्रा.पं.सिरसोली सरपंच विनोद कारेमोरे यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान - शोध पथकाची कारवाई

Sat Jun 10 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवार ता.09) 8 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे इम्पॅरियल साई कंन्स्ट़्र्रक्शन, पडोले लेआऊट, परसोडी यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्या पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com