– शोध जुगाडू इंजिनिर्सचा स्पर्धा – २०२३
नागपूर :- ग्रामायण प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या शोध जुगाडू इंजिनिर्सच्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील प्रतिभागी सहभागी झाले होते.
शालेय गटात प्रथम क्रमांक अथर्व बागडे या विद्यार्थ्याला मिळाला. अथर्वने विविध कामे करण्यासाठी रोबोट तयार केला. हा रोबोट ऑर्डरप्रमाणे जेवण त्या त्या टेबलवर पोहचवू शकतो. दुसऱ्या क्रमांकावर क्षितिज कोलते या विद्यार्थ्याला स्थान मिळाले. क्षितिजने आईचा त्रास वाचवण्यासाठी मिरची कटर तयार केले.
युवा गटात प्रथम क्रमांक योगेश लिचडे या विद्यार्थ्याला मिळाला. योगेशने शेतात शेतकऱ्यांना राहण्यासाठी लोखंड आणि टिनाचे मचाण तयार केले. हे मचाण वारा, वादळ, पाऊस आणि पावसाळ्यात पडणाऱ्या विजापासून सुरक्षित आहे. तसेच, उंचीवर असल्यामुळे प्राण्यांपासून सुरक्षित आहे. दुसऱ्या क्रमांकावर ख़ुशी गुप्ता या विद्यार्थिनीला स्थान मिळाले. ख़ुशीने महिला सुरक्षा पेन तयार केला. या पेनात एका बटणावर दाबल्याने ध्वनी आणि प्रकाश होतो. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेत वाढ होते.
स्पर्धेचे परीक्षक अभिजीत राऊत आणि स्वामिनी चोप्रा यांनी जुगाडू इंजिनियर्सच्या उपकरणांचे परीक्षण केले. संयोजक म्हणून अभय देशमुख आणि कविता देशमुख आणि किशोर केळापुरे यांनी जबाबदारी सांभाळली.
ग्रामायण प्रतिष्ठानच्या या स्पर्धेचा उद्देश जुगाडू संशोधकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या नवकल्पनांचा प्रचार करणे हा आहे.