– नगरपालिके विषयी नागरिकांमध्ये तीव्र संताप
– प्रभाग क्रमांक 27 मधील नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित
यवतमाळ :- शहरातील वडगाव परिसरातील प्रभाग क्रमांक 27 मध्ये पावसाच्या पाण्याने रस्त्यावर पूर आला आहे अशातच प्रभाग क्रमांक 27 ला लागूनच स्मशानभूमी असल्याने संपूर्ण घाण पाणी हे नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे येथील नागरिकांना डेंगू सारखे आजार होत असून या संपूर्ण प्रकाराकडे यवतमाळ नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याने नगरपालिकेविषयी येथील नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहे.
यवतमाळ शहरातील वडगाव येथील प्रभाग क्रमांक 27 परोपटे लेआउट व प्रताप नगर येथे गेल्या 20 वर्षापासून नागरिक वास्तव्यास आहे मात्र या प्रभागातील काही परिसरात अजूनही रस्ते नाही नाल्या सुद्धा नाही अशातच लागूनच स्मशानभूमी असल्याने स्मशानभूमीतील घाण पाणी नागरिकांच्या शिरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अशातच काही काही दिवसांपासून या परिसरात पावसाचे जोरदार आगमन सुरू असून स्मशानभूमीच्या घाण पाण्यासोबतच पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांना डेंगू सारखे आजार होत आहे.
येथील प्रभागातील नागरिकांनी नगरपरिषद मुख्याधिकारी सरनाईक यांना यांची माहिती वेळोवेळी दिली मात्र यवतमाळ नगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी प्रभाग क्रमांक 27 कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे तसेच या प्रभागात कचरा गोळा करणारी घंटागाडी सुद्धा येत नसल्याने सर्वत्र कचरे कचऱ्याचे डिगारे साचून दुर्गंधी पसरली आहे प्रभागात वाढलेल्या अडचणी बाबत विद्यमान आमदार यांना सुद्धा निवेदन देण्यात आले मात्र विद्यमान आमदारांनी सुद्धा या प्रभाग क्रमांक 27 येथील नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे या गंभीर समस्येकडे यवतमाळ नगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांनी केले आहे