संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- ‘सद्रक्षणाय खलनिग्रहनाय’ या ब्रीद वाक्यानुसार परिसरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची मुख्य जवाबदारी ही पोलिसांवर असते तेव्हा आज 8 जुलै पासून सुरू होणाऱ्या मुस्लिम बांधवांचा सण असलेल्या ‘मोहरम ‘ दरम्यान अचानक एखादी मोठी अनुचित घटना घडून कायदा व सुव्यस्थाचा प्रश्न निर्माण झाल्यास परिस्थितो नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासन किती कटिबद्ध राहू शकते याची परीक्षण चाचणी म्हणून काल 6 जुलै ला सायंकाळी 7 दरम्यान जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भाजी मंडी चौकात पोलीस प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करणाऱ्या आंदोलनकारांना पांगविण्यासाठी पोलीस प्रशासन गांभीर्याने किती वेळेत योग्य ती भूमिका घेऊ शकते यासाठी पोलिसांची घेण्यात आलेली रिहर्सल, मॉक ड्रिल यशस्वी पार पडली.
स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भाजी मंडी चौकातील काही नागरिक तणावपूर्ण वातावरण निर्माण करून रस्त्यावरच जाळपोळ करण्यासह पोलीस प्रशासन विरोधात रोष दर्शवित असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या गुप्त विभागाला मिळताच पोलिसानी घटनास्थळी पोहोचून आंदोलनकाऱ्यांची चित्रफीती कॅमेऱ्यात कैद करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहितो देण्यात आली याप्रसंगी बघ्यांची एकच गर्दी जमली असून दोन्ही बाजूची वाहतूक ही बंद करण्यात आली होतो तर बऱ्याच वेळे नंतर एकीकडे आंदोलना ला तेज गती मिळत असल्याचे दृश्य निर्माण होतात त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे, पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे ,एपीआय सचिन यादव, पोलीस अधिकारी राखुंडे आदी पोलीसानी ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले व तणावपूर्ण स्थिती नियंत्रणात आणली. याप्रकारे पोलीसांच्या वतीने घेण्यात येणारी मॉक ड्रिल यशस्वी ठरली.