अरोली :- रेवराल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य अंतराम श्रावणकर यांनी रेवराल गावातील विविध समस्या सोडवण्यासाठी नुकत्याच झालेल्या महसूल मंत्री तथा पालकमंत्री यांच्या भव्य जनसंवाद कार्यक्रमात निवेदन दिले.
माजी उपसरपंच अंतराम श्रावणकर सदस्य यांनी दिनांक 23 मार्चला वृंदावन सेलिब्रेशन लान मौदा येथे झालेल्या राज्याचे महसूल मंत्री व नागपूर तथा अमरावती जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यकमाला भेट देऊन रेवराल गावातील विविध समस्यांचे निवेदन दिले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,आपल्या गावाच्या विकासाच्या दृष्टीने नागरिकांना होत असलेल्या त्रासाचे निवारण व तसेच झुडपी जंगल जागेवर अतिक्रमण पट्टा मिळून त्यांचे ठिकाणावर गरजू लोकांना घरकुल द्यावे. गावात राष्ट्रीयकृत बँक सुरू करू नागरिकांना, विद्यार्थ्यांना ,महिलांना ,निराधार लाभार्थींना व शेतकऱ्यांचे आर्थिक अडचणी मुक्त करण्याचा परस्पर यामागचा हेतू आहे. 40 वर्षापासून झुडपी जंगल मध्ये असणारे सात भाऊ टोली यांच्या प्रश्नाला प्रतिसाद देऊन शासकीय लाभा पासून वंचित रहात असलेल्या कोडी परिवार त्यांना पट्टा मिळण्यास पात्रता मिळावी. मोदी आवास योजना अंतर्गत आरसीसी चे घर बांधता येईल या हेतूने पुढाकार घ्यावा.तसेच जवळपास असणारे शेतकऱ्यांची शेत पिकांना कमी दरात बी बियाणे व लागणारा सोडा सल्फेट इत्यादी चे भाव कमी करण्यात यावी व शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव द्यावा. शेतकऱ्यांसाठी कृषी तपासणी केंद्र मिळण्यात यावे.PWD बांधकाम विभाग चे डांबरी रोड लवकरात लवकर पूर्ण व्हावे ,जेणेकरून बसची सुविधा गावातले विद्यार्थी तालुक्यापर्यंत शिक्षणात करिता व शासकीय कार्यालया चे कामा करिता सुविधा होईल.
2011 च्या जनगणने झालेल्या सर्वे मुळे भूमी अभिलेख कार्यालय येथे झालेला कागदी बारदाना घोटाळ्याचे पाठपुरावा, दक्षता आवर्जून समोरील आणून फेरफार व सिटी सर्वे करण्यास उपअधीक्षक भूमि अभिलेख मौदा यांना वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मान्यता द्यावी.
तसेच नागरी सुविधा व जन सुविधा योजनेअंतर्गत मिळणारी मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्यात यावी.अशा मागण्या त्यांनी आपल्या निवेदनातून केलेल्या आहेत.