इतर मागास बहुजन कल्याण मंत्र्यांकडून विभागाचा आढावा

 मुंबई  : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या  विविध योजनांच्या माहितीचे सादरीकरण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासमोर करण्यात आले.

              मंत्रालयातील परिषद सभागृह येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अतिरक्त मुख्य सचिव नंदकुमार यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व भौतिक योजनांच्या माहितीचे सादरीकरण केले. यावेळी उपसचिव (आश्रमशाळा विभाग) कैलास साळुंखेसंचालक सिध्दार्थ झाल्टेउपसचिव महामंडळे   सहस्त्रबुध्दे, उपसचिव  जनबंधूमहाज्योतीचे व्यवस्थापक प्रदीप डांगे यासह इतर अधिकारी  उपस्थित होते.

           अतिरक्त मुख्य सचिव नंदकुमार सादरीकरणादरम्यान म्हणालेविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग यांच्या आर्थिकसामाजिक व शैक्षणिक विकासासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी हा विभाग स्वतंत्रपणे काम करत असून विभागामार्फत  इतर मागास बहुजन घटकातील नागरिकांसाठी वैयक्त‍िक व समूह विकासाच्या योजना राबविण्यात येतात. तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने ‘निपूण भारत’ ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व वसतीगृह अधीक्षकांसाठी कौशल्य विकसित करण्यात येत आहे.

      महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था” (महाज्योती) ही संस्था या घटकांतील विद्यार्थ्यांसाठी सामाजिकशैक्षणिकआर्थिक विकास, संशोधन, रोजगारभिमुखता वृद्धी, कौशल्य विकासस्वयंरोजगारग्रामीण विकासशेती विकासव्यक्तिमत्व विकासस्पर्धात्मकता विकाससामाजिक ऐक्य व सलोखा आणि तत्सम क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवित आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना, आश्रमशाळांसाठी राबविण्यात येणारे इतर उपक्रम व योजना, परदेश शिष्यवृत्ती योजना, मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीवसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेसाठी भरीव तरतूदबंजारा समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना व विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांनी या बैठकीत सादर केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

चिमूरच्या विकास आराखड्याबाबत राज्य सरकार सकारात्मक - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Thu Aug 18 , 2022
 शहीद क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन चंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरचे योगदान ऐतिहासिक आहे. या शहिदांच्या भूमीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. चिमूर येथे शहीद क्रांतीदिनानिमित्त आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com