महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या गट-अ, गट-ब संवर्गाचा निकाल जाहीर

मुंबई :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ व गट-ब अशा एकूण सहा संवर्गाच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या त्यांचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

प्राध्यापक, मनोविकृतीशास्त्र (Psychiatry), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (धाराशिव), सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ., सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (धाराशिव), सहयोगी प्राध्यापक, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र (Opthalmology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (नंदुरबार), सहयोगी प्राध्यापक, प्रसुती शास्त्र व स्त्रीरोगशास्त्र (Obstetrics & Gynecology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (परभणी), सहायक प्राध्यापक, आय.सी.सी.यु. औषधवैद्यकशास्त्र (I.C.C.U. General Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट-ब (सातारा) या परिक्षांचा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्राध्यापक, विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ, सिंधुदुर्गचा निकाल जाहीर

प्राध्यापक, विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ, सिंधुदुर्ग या पदाच्या मुलाखती २८ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या पदाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

सहयोगी प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र (Anatomy), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, गट-अ चार निकाल जाहीर

सहयोगी प्राध्यापक, शारीररचनाशास्त्र (Anatomy), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, गट-अ या पदाच्या मुलाखती दिनांक ०८ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. प्रस्तुत संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्राध्यापक, क्षयरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ चे निकाल जाहीर

प्राध्यापक, क्षयरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ या पदाच्या मुलाखती दिनांक २७ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२२ च्या प्रतिक्षायादीच्या निकाल जाहीर

महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२२ चा अंतिम निकाल १० ऑक्टोबर, २०२३ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. परीक्षेच्या अंतिम निकालानुसार प्रतिक्षायादीतून उमेदवार उपलब्ध करुन देण्याची शासनाने मागणी केली आहे. त्यानुसार अर्जातील दाव्यांच्या अनुषंगाने पदासाठीची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून प्रतिक्षायादीतून गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या शिफारशी शासनाकडे करण्यात येत आहेत.

प्रतिक्षायादीनुसार शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आला असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजकारणातून समाजहित जपणारा नेता गमावला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Wed Dec 11 , 2024
– माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई :- ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सोमनहल्ली मैल्लया कृष्णा तथा एस.एम.कृष्णा यांच्या निधनाने, आपल्या राजकारणातून समाजहित जपणारा आणि देशाच्या सेवेसाठी समर्पित भावनेने कार्यरत असलेले नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, एस. एम. कृष्णा यांनी लोकहिताच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com