– कोदामेंढी ग्रामपंचायत पथदीप घोटाळा प्रकरण
कोदामेंढी :- येथील सरपंच आशिष बावनकुळे यांनी 3,88, 474 पथदीप घोटाळा केला आहे? याबाबत मागील पंधरा दिवसांपूर्वी पासून विविध मराठी व हिंदी दैनिकांमध्ये दररोज वृत्त प्रकाशित होत आहेत. 22 ऑक्टोबर मंगळवार ला अरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्नेहल राऊत व कॉन्स्टेबल राजेंद्र पूडके यांनी चौकशी करून सरपंच, सचिव व दुकानदारावर गुन्हे दाखल करण्यासाठी ऑनलाईन तक्रार करणारे सामाजिक कार्यकर्ते यांच्या घरी येऊन त्यांचे बयान त्यांची स्वाक्षरी घेऊन नेलेले आहे.
शनिवार 19 ऑक्टोबरला गट विकास अधिकारी मौदा यांना भ्रमणध्वनीवरून विचारपूस केली असता ,त्यांनी ग्रामपंचायत कोदामेंढीचे सचिव एस. एन. पाटील यांना पत्र देऊन पथदीप घोटाळ्याच्या अहवाल सात दिवसाच्या आत अहवाल म्हणजेच 25 ऑक्टोबर शुक्रवार पर्यंत अहवाल मागितला होता व तो अहवाल गट विकास अधिकारी मौदा ऑनलाइन तक्रार करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मेल आयडीवर पाठविणार होते. मात्र आज शुक्रवारी 25 ऑक्टोबरला रात्री साडेआठ पर्यंत ई-मेल आयडीवर अहवाल न आल्याने गट विकास अधिकारी यांना विचारपूस करण्यासाठी साडे रात्री साडेआठ वाजता भ्रमणध्वनी केले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
शनिवार 26 ऑक्टोबरला पुन्हा मौदा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय झिंगरे व ग्रामपंचायत सचिव एस .एन. पाटील यांना भ्रमणध्वनी केले असता त्या दोघांनीही प्रतिसाद दिले नाही . मौदा पंचायत समितीचे विस्तार शरद दोनोडे यांना भ्रमणध्वनी केले असता त्यांनी सांगितले की ,शुक्रवारी अहवाल आला नसेल तर आज शनिवारी व उद्या रविवारी सुट्टी आहे . त्यामुळे सोमवारला अहवाल येण्याची शक्यता आहे. तुम्ही पुन्हा सोमवारला भ्रमणध्वनी करून विचारून पहावे. त्या अहवालाकडे मौदा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.