– मनपा हॉटमिक्स विभागाद्वारे विविध भागांमध्ये कार्यवाही
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध भागातील ३६३३.९ मीटर लांबीच्या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आलेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार हॉटमिक्स विभागाद्वारे २५ ऑक्टोबर २०२३ ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये शहरातील अनेक भागांचे डांबरीकरण व खड्डे बुजविण्याचे कार्य करण्यात आले.
हॉट मिक्स विभागाद्वारे आतापर्यंत १९००२.२९ चौरस मीटर क्षेत्रफळातील ३६३३.९ मीटर लांबीचे रस्ते दुरूस्ती कार्य करण्यात आलेले आहेत. रस्त्यांच्या स्थिती संदर्भात नागरिकांकडून अनेक तक्रारी मनपाला प्राप्त झाल्या. या तक्रारीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्याद्वारे मनपाच्या दहाही झोन स्तरावर कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार हॉटमिक्स विभागाद्वारे रस्ते दुरूस्तीची कार्यवाही करण्यात आली.
मनपाद्वारे गणपती नगर गोधरी रोड, भरणी कारखाना रोड, संकल्प नगर हुडकेश्वर नगर, महेंद्र नगर, उदय नगर वाठोडा, महाराणा नगर गोधनी रोड, विद्या नगर वाठोडा, वृंदावन नगर बिनाकी मंगळवारी, मनीष नगर, आरबीआय ते एलआयसी चौक, जपानी गार्डन मो. रफी चौक, आयुर्वेदिक लेआउट, हजारी पहाड गायत्री कॉलनी, हायकोर्ट मो. रफी चौक, शंभू नगर मानकापूर घाट, काटोल नाका चौक, वर्धा रोड शिवणगाव, राजभवन मनपा शाळा, सिव्हिल लाईन्स विधान भवन जवळ, काश्मीरी गल्ली, सुगत नगर ते समता नगर, भोले पेट्रोल पम्प, धंतोली रेल्वे अंडर ब्रिज, दाभा रोड, मारुती सेवा चौक, श्रीराम नगर वर्धा रोड, पटेल चौक डालडा कंपनी, मेडिकल चौक, राजीव गांधी चौक, वंजारी नगर पाण्याची टाकी, अशोक चौक, काछीपुरा चौक महाराज बाग, महाराज बाग ते व्हीसीए चौक, मेहाडीया चौक ते जनता हॉटेल चौक, विद्यापीठ एक्सिस बँक, यशवंत स्टेडियम, यशोदा नगर हिंगणा, ज्वाला माता मंदिर पोलिस लाईन टाकळी, लोहापूल शनि मंदिर या मार्गांवर डांबरीकरण करुन रस्ते दुरस्तीचे काम हॉट मिक्स विभागाद्वारे करण्यात आलेले आहेत.