मुंबई :- माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दिनांक 12 ऑगस्ट 1960 रोजी राज्याच्या पहिल्या अधिवेशनात केलेल्या भाषणाचा उल्लेख करत सर्व उच्चपदस्थ सरकारी कार्यालये नागपूर मध्ये स्थलांतरित करण्याची मागणी आ प्रवीण दटके यांनी केली.
राज्यातील १. कृषी संचालक, २. शिक्षण संचालक, ३. उच्च शिक्षण संचालक, ४. क्रीडा संचालक, ६. पशुसंवर्धन संचालक, ७. सहकार आयुक्त, ८. संचालक नगर नियोजन, ९. मुख्य वन संरक्षक, १०. आयुर्वेद संचालक, ११. संचालक भूजळ सर्वेक्षण, १२. मुख्य अधीक्षक तुरुंग, १३. मुख्य अधीक्षक निबंधक, १४. जमाबदी आयुक्त आणि भूलेख संचालक, १५. संचालक सार्वजनिक आरोग्य, १६. संचालक सामाजिक कल्याण ही 16 कार्यालये नागपुरात असणे आवश्यक असतांना वन संरक्षक कार्यालय वगळता इतर सर्व कार्यालये पुण्यातच असल्याचे दटके म्हणाले.
विदर्भात गेल्या ६० वर्षात औद्योगिकरण न झाल्यामुळे व शासकीय कार्यालयेही पुणे – मुंबईत असल्यामुळे विदर्भातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना योग्य संधी मिळाली नाही तसेच विदर्भात उद्योग क्षेत्राचा विकासही झाला नाही.
त्यामुळे नागपूरसह विदर्भात जास्तीत जास्त गुंतवणूक आणावी आणि शासकीय कार्यालये नागपुरात स्थानांतरित करावे अशी मागणी प्रवीण दटके यांनी केली.
यावेळी उदय सामंत यांनी कालच कॅबिनेट मध्ये नागपुरातील गुंतवणुकीसंदर्भात निर्णय झाला असून शासकीय कार्यालयांबाबत तपासून निर्णय घेऊ असे आश्र्वासित केले.