कन्हान :- श्रीराम प्राण प्रतिष्ठा दिवसा निमित्य श्री हनुमान मंदीर खदान रोड कांद्री येथे भाविक मंडळी व्दारे धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यात आला.
अयोध्या येथे श्रीराम प्राण प्रतिष्ठा दिवस आनंदात साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषगांने खदान रोड कांद्री येथील श्री हनुमान मंदिर देवस्थान येथे श्रीराम मानस चरित्र आणि श्री हनुमान चालीसा पाठ, भजन त्यानतंर आरती करून प्रसाद, अल्पोहार वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आयोजक कवडु आखरे, रामा हिवरकर, मारोती आष्टणकर, सेवक भोंडे , उदयभान विश्वकर्मा, प्रविण आखरे, मंगला काली कांबळे, ऊषा वंजारी, इंदु टेंभरे, सुमित्रा किरपान, ऊषा वाडीभस्मे, इंदिरा मंसुहरे, तिरुला डाहारे, मनोज कश्यप, वामन देशमुख सह भाविक मंडळीनी कार्यक्रमाच्या यशस्विते करिता सहकार्य केले. कार्यक्रमास भाविक महिला, पुरूष नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.