नागपूर :-विश्वख्यातीप्राप्त कृषी वैज्ञानिक डॉ.एन.एम.निमगडे यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी त्यांच्या स्वकथन “धुळीतून ध्येयाकडे” या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ संपन्न होईल. या कार्यक्रमास जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे. या कार्यक्रमांचे अध्यक्षपदी एम.सी वानखेडे म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे स्थळ अर्पण सभागृह, हिंदी मोर भवन, झाशी राणी चौक, सिताबर्डी नागपूर येथे दुपारी 2 वाजता. कार्यक्रम आयोजित केलेला आहे. प्रा.रणजीत मेश्राम, प्रा. गंगाधर अहिरे, प्रभाकरराव निमगडे, सुजित मुरमाडे, सुधीर भगत यांची उपस्थिती राहतील. आयोजक सुधीर भगत, नीमगडे परिवार आणि क्रिष्णचंद्र दोराईस्वामी अय्यर व निमगडे परिवार आणि अनिल सूर्या (नवी दिल्ली) यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.