सुशासन दिनी गडकरीच्या हस्ते अटल आरोग्य कालदर्शिकेचे प्रकाशन 

नागपूर :- भारतरत्न श्रध्येय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी सुशासन दिनानिमित्त भाजप वैद्यकीय आघाडी नागपूर महानगर द्वारा निर्मित अटल आरोग्य कालदर्शिकेचं प्रकाशन भारत सरकारचे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे शुभहस्ते संपन्न झाले. भाजप शहर अध्यक्ष  प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात भाजपा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष बालरोग तज्ञ डॉ गिरीश चरडे, महामंत्री आयुर्वेद तज्ञ डॉ श्रीरंग वराडपांडे, शहर पदाधिकारी डॉ अजय सारंगपुरे, डॉ तुषार पंदेल , शिरीष जोशी आदी डॉक्टर्स उपस्थित होते. आरोग्य कालदर्शिकेची निर्मीती व संकल्पना डाॅ श्रीरंग वराडपांडे यांची असुन कालदर्शिकेत वैद्यकीय आघाडीचे वार्षिक शिबीरउपक्रम ,केंद्राच्या आरोग्य योजनांची माहिती , आरोग्य विषयी जनजागृती कार्यक्रम, सेवा क्लिनिक, खासदार हेल्थ कार्ड आदींची माहिती छायाचित्रांसहीत दिलेली आहे.या कालदर्शिका डिजिटल प्रत येत्या काळात नागरिकांना पोहचेल अशी व्यवस्था आयोजकांनी केली आहे. या कालदर्शिकेच्या निर्मितीसाठी डॉ कोमल काशीकर,डॉ क्षितिज गुल्हाने, साईनाथ सक्करदरा,डॉ पुष्कर बिजवे, डायगनोपलास चे राकेश कोणतमवार, आणि moc चे शिरीष जोशी, डॉ रणदिवे यांनी सहकार्य केले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकशाहीत प्रश्न उपस्थित करणे ही नागरिकांची जबाबदारी

Mon Dec 26 , 2022
नागपूर : सुदृढ लोकशाहीत प्रश्न विचारण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रगल्भ व सर्वसमावेशक लोकशाहीसाठी प्रश्न उपस्थित करणे ही नागरिकांची जबाबदारी असल्याचे मत विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले यांनी व्यक्त केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात ते बोलत होते. भारतीय संविधान आणि विधिमंडळाची रचना कार्यपद्धती व कायदा तयार करण्याची प्रक्रिया या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com