दिव्यांगाचे पुनर्वसन करून मुख्य प्रवाहात आणणे हाच प्रयत्न-राज कापसे

संदीप बलविर, तालुका प्रतिनिधी

“स्वातंत्र्याची अमृतगाथा” या विषयावर स्नेहसंमेलन संपन्न

राष्ट्रमाता बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या उपक्रम

टाकळघाट :- दिव्यांग विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने प्रगती साधायची असेल तर त्यांचा आत्मविश्वास वाढवून आत्मनिर्भर बनविणे गरजेचे आहे.या करिता विध्यार्थ्यांना विविध अनुभवांना सामोरे जाण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.पुनर्वसन झालेले विद्यार्थी समाजाच्या मुख्य प्रवाहात सर्वसामान्यांच्या बरोबरीने वावरतात.त्यांनी सर्वसामान्यासारखे मुख्य प्रवाहात वावरावे म्हणूनच गत २२ वर्षांपासून आपण जातीने प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रमाता बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव राज कापसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केले.

राष्ट्रमाता बहुउद्देशीय शिक्षण मंडळ,नागपूर द्वारा संचालित टाकळघाट येथील संत विकटुबाबा मतिमंद मूला- मुलींची निवासी शाळा,मनोदय वर्कशॉप फॉर मेंटल चॅलेंज,राष्ट्रमाता मुलींचे वसतिगृह,यशरत्न मुलांचे वसतिगृह यांच्या संयुक्त विध्यमाने नुकतेच “स्वातंत्र्याची अमृतगाथा” हा विषय घेऊन स्नेहसंमेलन संस्थेच्या प्रांगणात साजरे करण्यात आले.

या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटलेले थोर नेते,क्रांतिकारी व महापुरुषांचे कार्य स्किट द्वारे चित्रण तसेच विविध देशभक्ती गीतांवर नृत्याविष्कार प्रदर्शित केला.विशेष बाब म्हणजे संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सामान्य विद्यार्त्यांसोबत एकत्र येत सामान्यांच्या तोडीचे किंवा त्यांच्या पेक्षाही सरस स्किट व नृत्य सादर केले.यावरून संस्थेतील पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी दिव्यांग विध्यार्थ्यांना मुख्यप्रवाहात आणण्याकरिता किती कटिबद्ध आहेत हे लक्षात येते.

यावेळी या स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणून टाकळघाट ग्रामपंचायत च्या सरपंच शारदा शिंगारे,अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव राज कापसे तर प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण अधिकारी किशोर भोयर,उपसरपंच नरेश नरड,संस्थेचे अध्यक्ष संकेत कापसे,माजी अध्यक्ष इंद्रालक्ष्मी कापसे,किशोर मुसळे,सुभाष अनवाने व मुख्याध्यापक अविनाश मोडक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

” स्वातंत्र्याची अमृतगाथा” ही संकल्पना लेखन व दिग्दर्शन सुनीता पुरी व वर्षा इंगळे यांनी स्किट दिग्दर्शन सुधाकर तिजारे व दिनेश हांडे,नैपथ्य निर्मिती नालंदा सहारे,खुशाल वंजारी,अतुल बारसागडे,निरोप शेंडे,आकाश आत्राम तर वेशभूषा शिल्पा देशपांडे व विजया गजभिये यांनी तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना निरोप

Fri Feb 17 , 2023
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली. यावेळी उभयतांनी राज्यपालांना भावी वाटचालीसाठी व दीर्घ आयुरारोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com