प्रतिबंधात्मक उपचारासाठी नियमित योग अनेक व्‍याधींवर परिणामकारक  – धीरज कुमार

– आरोग्‍य सेवा आयुक्‍तालयात जागतिक योग दिन साजरा

मुंबई :- “मानवी जीवनात असंसर्गजन्‍य आजारांचे वाढत असलेले प्रमाण चिंताजनक आहे. या आजारांवर नियंत्रणासाठी योगासारख्‍या अखर्चिक व किमान संसाधनांची आवश्‍यकता असलेल्‍या प्रतिबंधात्‍मक उपचारांचा वापर होणे आवश्‍यक आहे. मेडिटेशन, योग यासारख्‍या थेरपींमध्‍ये सातत्‍य व नियमीतपणा ठेवला, तर अनेक आजारांपासून दूर राहणे शक्‍य आहे. परदेशामध्‍ये ज्‍या प्रमाणात योगोपचाराचा वापर केला जात आहे, त्‍या प्रमाणात आपल्‍या देशात प्रसार होणे गरजेचे आहे. शारीरिक आजारांव्‍यतिरिक्‍त क्रोध, मानसिक व्‍याधींवर नियंत्रण मिळवण्‍याचे सामर्थ्‍य योगामध्‍ये असल्‍यामुळे सर्वांनी आपल्‍या दिनचर्येतील काही वेळ योगासाठी व्‍यतीत करावा”, असे मनोगत आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी व्यक्त केले. 

आरोग्‍य विभागाच्‍यावतीने आरोग्‍य सेवा आयुक्‍तालयात जागतिक योग दिनाच्‍यानिमित्‍ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्‍य सेवा आयुक्‍त धीरज कुमार यांच्या हस्‍ते झाले. वित्‍त संचालक जयगोपाल मेनन, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड आदींसह आयुक्‍तालयातील अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ‘सचित्र योगक्रम’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्‍यात आले.

सहायक संचालक डॉ. सुभाष घोलप यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जागतिक योग दिवसाची पार्श्‍वभूमी व महत्त्व विषद केले. उद्घाटन समारंभानंतर ‘ताण तणावापासून मुक्‍तीसाठी योग’ या विषयावर लोणवळयाच्‍या कैवल्‍यधामचे सहायक प्राध्‍यापक डॉ.सतीश पाठक, ‘असांसर्गिक रोगांमधील योगाचे महत्त्व’या विषयावर कैवल्‍यधामचे प्राध्‍यापक डॉ. शरदचंद्र भालेकर आणि ‘अष्‍टांग योग-समज/ गैरसमज’ या विषयावर सायन येथील आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्‍यापक डॉ. गोरक्षनाथ आव्‍हाड यांची व्‍याख्‍याने झाली. तसेच डॉ. साक्षी हडप व डॉ. निकेश अंधारे यांनी उपस्थितांकडून योगाची प्रात्‍यक्षिक करवून घेतली.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रसाद भंडारी यांनी, तर आभारप्रदर्शन डॉ. सुभाष घोलप यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

GARUDA AMUSEMENT PARK का बाल बांका नहीं होगा !

Thu Jun 22 , 2023
– क्यूंकि इस कंपनी के प्रमुख की अन्य कंपनी के पार्टनर है SF व VK  नागपुर :- स्थानीय अम्बाझरी गार्डन के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन को GARUDA AMUSEMENT PARK के सर्वेसर्वा ने गिरवाया,जिसके विरोध में अम्बेडकरी समाज का आंदोलन तब से जारी हैं.इस बीच तय रणनीति के तहत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल ने पार्क को विकसित किये जाने के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com