नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य अधिकारी तथा सामुचित प्राधिकारी पीसीपीएनडीटी डॉ. दिपक सेलोकर यांच्या कक्षात सल्लागार समितीच्या नियमित सभेचे आयोजन (31 जुलै) करण्यात आले होते. सल्लागार समितीच्या सभेत सोनोग्राफी केंद्राचे नव्याने नोंदणी करीता एकुण 11 प्रकरण तसेच सोनोग्राफी केंद्राचे नुतनिकरणा करीता एकुण 11 प्रकरणे समिती समोर ठेवण्यात आले होते. सर्व अर्जाची तपासणी करुन सोनोग्राफी केंद्राच्या नविन नोंदणी तसेच नुतनिकरणास समितीने सर्वानुमते मंजुरी प्रदान केली.
नागपुर जिल्हाच्या सीमेलगतच्या राज्यात जाऊन काही गर्भवती माता गर्भलिंग निदान करुण गर्भातील लिंग जाणुन घेत आहे, असा संशय सल्लागार समितीच्या सदस्यानी सभेत व्यक्त केला.
नागपुर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एम.टी.पी तथा सोनोग्राफी केंद्राला नियमित भेट देण्यात यावे असे आदेश वैद्यकिय आरोग्य अधिकारी, डॉ.दीपक सेलोकर यांनी दिले.
एम.टी.पी तथा सोनोग्राफी केंद्राची दर तीन महिन्यानी होणारी तपासणी (त्रैमासिक तपासणी) हि वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांनी नेमुन दिलेले सहाय्यक सामुचित प्राधिकारी यांच्या मार्फत करण्यात येत असते. एम.टी.पी तथा सोनोग्राफी केंद्र तपासणी दरम्याण आढळुन आलेल्या त्रृटयां कडे विशेष लक्ष् देण्यात यावे असे आदेश काढण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्या आहे.
नोडल अधिकारी पीसीपीएनडीटी तथा एम.टी.पी यांनी सोनोग्राफी केंद्राना अकस्मात भेटी दयाव्यात तसेच कायदयाच्या भंग होत असलेल्या केंद्रावर पीसीपीएनडीटी तथा एम.टी.पी कायदया अंतर्गत कडक कार्यवाही कराव्यात अश्या सुचना समितीने दिलेल्या आहे.
या सभेला वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर, पीसीपीएनडीटी नोडल अधिकारी डॉ.सरला लाड, सल्लागार समितीचे सदस्य, डॉ.वर्षा ढवळे स्त्रीरोग तज्ञ, डॉ.चैतन्य शेंबेकर स्त्रीरोग तज्ञ, डॉ.प्रशांत ओंकार क्ष-किरण तज्ञ, तथा सामाजिक कार्यकर्ता विणा खानोरकर तथा मनपाचे पी.आर.ओ. मनिष सोनी तसेच ॲड.आनंद बीसे, पीसीपीएनडीटी कायदे सल्लागार इत्यादी उपस्थित होते.