‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आता सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई :- ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी सप्टेंबर २०२४ मध्येही सुरू राहणारआहे. तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व' ग्रंथाचे प्रकाशन

Tue Sep 3 , 2024
– ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचे वितरन  मुंबई :- महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सव निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते’वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३:३० ते ५ या वेळेत मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!