नवी मुंबई :- कोपरखैरणे पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्या नेरुळ व एन आर आय पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस पडून असलेल्या मोटार दुचाकी, स्कुटर, ऑटो रिक्षा,फोर व्हिलर या वाहनांच्या मालकी हक्काबाबत कोपरखैरणे पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्याशी संपर्क साधण्यात यावा. अशी माहिती कोपरखैरणे पोलीस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा पाटील यांनी दिली आहे.
कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या नेरुळ व एन आर आय हद्दीत विविध कारणास्तव प्राप्त झालेली 20 दुचाकी वाहने, 1- चारचाकी वाहन, 2 थ्री व्हीलर एकूण 23 बेवारस वाहने सानपाडा पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र करुन ठेवण्यात आली आहेत. वर्षानुवर्षे या वाहनांचे मूळ मालक सदर वाहने घेऊन जाण्यास आलेले नसल्याने कोपरखैरणे पोलीस ठाण्यामार्फत सदर वाहनांच्या मूळ मालकांनी सात दिवसांच्या आत आपली वाहने कागदपत्रे दाखवून या बातमी सोबत दिलेल्या यादीतील आपल्या वाहनांची ओळख पटवून ती घेऊन जावी असे आवाहन कोपरखैरणे पोलीस ठाणे नवीमुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा पाटील यानी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.