पोलीस ठाणे वाठोडा येथील खुनाचे गुन्हयात अटक असलेल्या आरोपीतांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (मकोका) अन्वये कारवाई केले बाबत

नागपूर :-पो ठाणे वाठोडा येथे अप.क. 33/2025 कलम 103 (1), 189 (2), (4),190,191 (3) बी.एन.एस प्रमाणे दाखल असुन सुदर गुन्हयाची थोडक्यात हकिगत अशी आहे की, यातील मृतक नामे अमोल कृष्णा वंजारी वय 31 वर्ष राह. अंतुजी नगर, भांडेवाडी, वाठोडा हा दिनांक 21.01. 2025 रोजी मध्यवर्ती कारागृह नागपुर येथुन जामीन वर सुटुन आला होता व दुसरे दिवशी दिनांक 22.01.2025 रोजी 22.30 वा. सुमारास त्याचा जुन्या वादाच्या कारणावरून सुरज नगर भांडेवाडी येथे आरोपी 1) जब्बार उर्फ यश प्रविण प्रधान वय 20 वर्ष, रा. गौड मोहल्ला, भांडेवाडी पारडी नागपुर 2) ऋशीकेश उर्फ साजन प्यारेलाल उके वय 30 वर्ष राह प्लाट न. 03. तुलसी नगर, भांडेवाडी नागपुर 3) भतुभम दशरथ मेश्राम वय 28 वर्ष रा. अबुमियों नगर, दर्गाजवळ, भांडेवाडी वाठोडा नागपुर व इतर विधी संघर्शग्रस्त बालकांनी धार धार शस्त्राने वार करून खून केला होता. गुन्हा दाखल होताच गुन्हयातील तिन्ही आरोपीलांना तात्काळ अटक करण्यात आली असुन सध्या ते मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे बंदीस्त आहेत. तसेच ईतर विधीसंघर्शग्रस्त बालक आहेत.

सदर गुन्हयाचा तपास हा कृश्णा साळुंके पो.उप.नि. यांनी केला असुन आज पावेता केलेल्या तपासात गुन्हयातील आरोपी व विधी संघर्श ग्रस्त बालकांचा गुन्हे अभिलेख पाहता गुन्हयातील आरोपी विरूद्ध ईतर पोलीस ठाण्यात सुद्धा गुन्हे दाखल आहेत. यातील टोळी प्रमुख आरोपी 1) जब्बार उर्फ यश प्रविण प्रधान वय 20 वर्ष, रा. गौंड मोहल्ला, नांडेवाडी पारडी नागपुर याचे विरुध्द पोलीस ठाणे वाठोडा येथे खुन 01 गुन्हा, पोलीस ठाणे पारडी येथे खुनाचा प्रयत्न थे 02 गुन्हे, असे एकूण 03 गंभीर स्वरुपाचे संघटीत गुन्हे आहेत. 2) ऋशीकेश उर्फ साजन प्यारेलाल उके वय 30 वर्ष यह. प्लाट न. 03, तुलसी नगर, भांडेवाडी नागपुर याचे विरुध्द पोलीस ठाणे कळमना येथे जबरी चोरी चा 01 गुन्हा, पोलीस ठाणे वाठोडा येथे खुनाचा 01 गुन्हा, दुखापतीचे 02 गुन्हे, अवैध दारू विकी, अपघात, पोलीस ठाणे पारडी येथे खुनाचा प्रयत्न 01 गुन्हा, असे एकूण 07 गुन्हे दाखल आहेत. 3) भशुभम दशरथ मेश्राम वय 28 वर्ष रा. अबुमियों नगर, दर्गाजवळ, भांडेवाडी वाठोडा नागपुर याचे विरुध्द पोलीस वाठोडा येथे खुनाचा 01 गुन्हा, दुखापतीचा 01 गुन्हा व पोलीस ठाणे पारडी येथे खुनाचा प्रयत्न 01 गुन्हा असे 03 गुन्हे दाखल आहेत. तसेच इतर विधीसंर्शग्रस्त बालक आहेत.

यातील टोळी प्रमुख जब्बार उर्फ यश प्रविण प्रधान वय 20 वर्ष रा. गौंड मोहल्ला, भांडेवाडी पारडी नागपुर हा नेहमी वेगवेगळ्या गुन्हेगारांना हाताशी धरून टोळी तयार करून गुन्हे करत असल्याचे त्यांचे गन्हे अभिलेखावरुन स्पष्ट झाले असल्याणे त्यांचे हे कृत्य मकोका कायद्या अंतर्गत संघटीत गुन्हयात मोडत असल्यामुळे नमुद आरोपी टोळी प्रमुख व टोळीतील सदस्यांवर आरोपीताविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अतंर्गत प्रस्ताव तयार करून मंजूरीसाठी वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आला असता, सदर गुन्हयात कलम 3(1), (2), 3(2), 3(4) महाराश्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 वाढ करण्यास मंजुरी मिळाली आहे व सदर गुन्हाचा पुढील तपास हा मा. सहा. पोलीस आयुक्त सा. सक्करदरा विभाग नागपूर भाहर हे करत आहेत.

अशा प्रकारच्या गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे गुन्हेगारांवर मकोका कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे निर्देश मा पोलीस आयुक्त साहेब नागपूर भाहर यांची दिलेले आहेत. त्यामुळे यापुढे सुध्दा अशा प्रकारे कोणीही गंभीर स्वरुपाचे गुन्हे केल्यास गुन्हेगारांवर मकोका, एमपीडीए अशा योग्य त्या कारवायां करण्यात येणार आहेत.

सदरची कारवाई चा प्रस्ताव पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशीक विभाग, रश्मीता राव, पोलीस उप आयुक्त परिमंडळ क्रमांक 4 यांचे व मा. सहायक पोलीस आयुक्त सक्करदरा विभाग यांचे मार्गदर्शनामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे वाठोडा यांनी तयार केला असून सदर प्रस्तावास अपर पोलीस आयुक्त दक्षीण प्रादेशीक विभाग यांनी मान्यता देवून पुढील तपास हा सहायक पोलीस आयुक्त सक्करदरा विभाग हे करत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रोडरोमिओंना धडा शिकविण्यासाठी गरज

Mon Mar 3 , 2025
कोंढाळी :- ग्रामीण/शहरी मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना व टपोरींना शाळा/हायस्कूल /महाविद्यालय, तसेच बसस्थानक परिसरात पोलीस प्रशासनासह, नागरिकांनीही मुलींना त्रास देणाऱ्या /छेड काढणाऱ्या रोडरोमीयों/टपोरिंचा बंदोबस्त करावा . ग्रामीण भागातून शहरी/निम शहरी भागातील हायस्कूल/कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येतात. या दरम्यान बस स्थानकावर ते शाळा/हायस्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन मार्गावर तसेच कोंढाळी येथील बस स्थानकाचे समोरील तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे सामोरील उडानपुला खाली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!