सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ९४ प्रकरणांची नोंद, उपद्रव शोधथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. बुधवार (ता.२२) रोजी उपद्रव शोध पथकाने ९४ प्रकरणांची नोंद करून ६६,७०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत ३४ प्रकरणांची नोंद करून १४,८०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत २ प्रकरणांची नोंद करून २०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ३ प्रकरणांची नोंद करून 1200 रुपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर आदींवर रस्तावर कचरा टाकणे याअंतर्गत २ प्रकरणांची नोंद करून ४००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ९ प्रकरणांची नोंद करून ९५०० रुपयांची वसुली करण्यात आली.

वैद्यकीय व्यावसायिकांनी बायोमेडिकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे याअंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून २५००० रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास ३५ प्रकरणांची नोंद करून रु ७००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ५ प्रकरणांची नोंद करून रु ५००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी पंचायत समिती येथे बाल हक्क संरक्षण विषयावर कार्यशाळा संपन्न

Fri Nov 24 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी पंचायत समिती सभागृह येथे जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय जिल्हा बाल संरक्षण कक्ष व इंडियन सोशल सर्विस युनिट ऑफ एज्युकेशन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील या ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे आज 24 नोव्हेंबर ला प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणामध्ये बालकांचे अधिकार आणि संरक्षण ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांची भूमिका […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com