सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ९० प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. मंगळवार (ता.१३) रोजी उपद्रव शोध पथकाने ९० प्रकरणांची नोंद करून ५३ हजार २०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत २८ प्रकरणांची नोंद करून ११,२०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०३ प्रकरणांची नोंद करून ३०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०९ प्रकरणांची नोंद करून ३६०० रुपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृह, लॉजिंग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय कॅटरस सर्व्हिस प्रोव्हायडर आदींनी रस्तावर कचरा टाकणे या याअंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून २००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०९ प्रकरणांची नोंद करून १४५०० रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी कचरा रस्ता, फूटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गराज व इतर दुरुस्तीचे व्यावसायिकाने रस्ता, फूटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०३ प्रकरणाची नोंद करून ३००० रुपयांची वसुली करण्यात आली.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास २८ प्रकरणांची नोंद करून रु ५६०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०७ प्रकरणांची नोंद करून रु ७००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका, कचरा जाळून उपद्रव निर्माण करणे याअंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून ५००० रुपयांची वसुली करण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Late Smt. Bhanutai Gadkari Inter-school Yogasan Competition 2024

Wed Feb 14 , 2024
Nagpur :- In the days of utilitarian Modem Society, Organization like Janardan Swami Yogabhyasi Mandal-is a rarity. It is an unique organization which propogates “Yog’ as a way of life or culture in the society for Contentment, Health and Happiness of every soul by imparting training in Yog to one and all irrespective of Caste, creed, religion, totally free of […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com