सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ८७ प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार ( ता. १८) रोजी शोध पथकाने ८७ प्रकरणांची नोंद करून ३७ हजार ८०० रुपयाचा दंड वसूल केला आहे.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत २० प्रकरणांची नोंद करून ८००० रुपयांची वसुली करण्यात आली.

कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 600 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु 800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. दवाखाने, इस्पितळे, पॅथलॅब, इत्यादींनी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. २०००/- दंड) या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून रु २००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत २ प्रकरणांची नोंद करून रु ४००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद या अंतर्गत ६ प्रकरणांची नोंद करून रु ६००० दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक रस्ता, फूटपाथ, मोकळी जागा, इत्यादी ठिकाणी, बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/ साठवणे, प्रथम या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून रु १००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त इतर ४२ व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून ८४०० रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून ७ प्रकरणांमध्ये ७००० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे संदीप सरदार, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे धनराज कावळे, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Fire Safety Week - Mock Drill at DPS MIHAN

Wed Apr 19 , 2023
Nagpur :- DPS MIHAN always believes in ensuring safety and security of its students and regularly sensitizes them by conducting mock drills in this regard. A mock fire and evacuation drill involving students and teachers was conducted on 18th April 2023 to create awareness amongst the students about fire-fighting techniques and the ways to respond swiftly in times of such […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!