सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ७३ प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. मंगळवार (ता:०५) रोजी उपद्रव शोध पथकाने ७३ प्रकरणांची नोंद करून ४२ हजार २०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत १९ प्रकरणांची नोंद करून ७ हजार ६०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०४ प्रकरणांची नोंद करून ४०० रुपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून ४ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०७ प्रकरणांची नोंद करून १० हजार रुपयांची वसुली करण्यात आली.

वर्कशॉप, गराज व इतर दुरुस्तीचे व्यावसायिकांने रस्ता फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून ०१ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलाबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून ०१ हजार रुपयांची वसुली करण्यात आली.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास २६ प्रकरणांची नोंद करून ५ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास १३ प्रकरणांची नोंद करून १३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या ०२ प्रकरणांची नोंद

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मंगळवार (ता:०५) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ०२ प्रकरणांची नोंद करून १० हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय रुग्णालयातील कचरा परिसरात पसरविणे या अंतर्गत हनुमाननगर झोन येथील मे. आनंद हॉस्पिटल, हनुमान नगर, क्रीडा चौक यांच्यावर कारवाई करीत ०५ हजार रुपये दंड वसूल केला. असे एकूण ०३ प्रकरणाची नोंद करून १५ हजार दंड वसूल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोवाड येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचा दोन हजार महिलांनी घेतला आस्वाद 

Wed Mar 6 , 2024
– २५ वर्षापासूनची परंपरा समोरही कायम राहणार – रिद्धी देशमुख नरखेड :- सबला महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्षा  आरती अनिल देशमुख याच्यां सौज्यन्याने शाखा मोवाड येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन मोवाड येथे महात्मा ज्योतीबा फुले सभागृहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रिद्धी सलील देशमुख, राहत ऋषिकेश देशमुख, डॉ पायल गौरव चतुर्वेदी, पूजा देशमुख,जोहरा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com