सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ६७ प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (ता. २१) रोजी शोध पथकाने ६७ प्रकरणांची नोंद करून ४८ हजार १०० रुपयाचा दंड वसूल केला आहे.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, रस्त्यावर मलमूत्र करणे (रु. ५००/- दंड) या अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून ५०० रुपयांची वसुली करण्यात आली. हातगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत १४ प्रकरणाची नोंद करून ५६०० रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत १० प्रकरणांची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. ४००/- दंड) या अंतर्गत ५ प्रकरणांची नोंद करून २००० रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत ३ प्रकरणांची नोंद करून रु ६००० दंड वसूल करण्यात आलेला आहे.

वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ५ प्रकरणांची नोंद करून रु ११,००० दंड वसूल करण्यात आला.वैद्यकीय व्यावसायिकांनी बायोमेडिकल कचरा सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून रु १०,००० दंड वसूल करण्यात आला. या उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास या अंतर्गत २० प्रकरणांची नोंद करून रु ४,००० दंड वसूल करण्यात आला.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था )असल्यास या अंतर्गत ८ प्रकरणांची नोंद करून रु ८,००० दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे  पवन डोंगरे, धंतोली झोनचे संदीप सरदार, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे धनराज कावळे, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महात्मा बसवेश्वर यांना मंत्रालयात अभिवादन

Sat Apr 22 , 2023
मुंबई :- महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनानिमित्त महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मंत्रालयात आज अभिवादन केले. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनीही महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com