सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ६६ प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. सोमवार (ता.०१) रोजी उपद्रव शोध पथकाने ६६ प्रकरणांची नोंद करून ४३ हजार ६०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत २५ प्रकरणांची नोंद करून १० हजार रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून १०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०६ प्रकरणांची नोंद करून २ हजार ४०० रुपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०३ प्रकरणांची नोंद करून ६ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०६ प्रकरणांची नोंद करून १० हजार ५०० रुपयांची वसुली करण्यात आली.

चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांच्या कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून २ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गराज, व इतर दुरुस्तीचे व्यावसायीक रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून ०१ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे, प्रथम या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून ०२ हजार रुपयांची वसुली करण्यात आली.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास १३ प्रकरणांची नोंद करून २ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०७ प्रकरणांची नोंद करून ७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. अशा एकूण ६६ प्रकरणांची नोंद करून ४३ हजार ६०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मतदान अधिकाऱ्यांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण, जिल्ह्यात ५००५ मतदान अधिकाऱ्यांची निवड तर २६८३ राखीव

Tue Apr 2 , 2024
– कोणत्या विधानसभा मतदार क्षेत्रात सेवा देणार ते ठरले गडचिरोली :- लोकसभा निवडणुकीकरिता मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली. निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर, जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, नोडल अधिकारी प्रशांत शिर्के व विवेक साळुंखे, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी एस.आर. टेंभूर्णे तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com