संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- बीकेसीपी शाळेत वाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा उत्तम पध्दतीने घेऊन शाळेचे मुख्य संचालक स्व.श्री अशोकजी खंडेलवाल यांच्या जयंती थाटात साजरी करण्यात आली.
सोमवार (दि.४) सप्टेंबर ला बीकेसीपी इग्रजी माध्यम शाळा कन्हान येथे दरवर्षी प्रमाणे नर्सरी ते १० वी च्या विद्यार्थ्याची वाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका (माध्य) कविता नाथ याच्या अध्यक्षेत तर प्रमुख अतिथी शाळा व्यवस्थापकिय सदस्य अशोक भाटिया, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, मुख्याध्यापिका (प्राथ.) रूमाना तुर्क, परिक्षक म्हणुन एस.के.पी. कॉलेज कामठी च्या सेवानिवृत प्राध्यापिका प्रविना हांडा, विद्या मंदीर शाळा टेकाडी (को.ख.) वरिष्ठ शिक्षिका विजया हांडा आदी मान्यवरांच्या हस्ते शाळेचे मुख्य संचालक स्व. अशोकजी खंडेलवाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन करून स्पर्धेची सुरूवात करण्यात आली. नर्सरी ते इयत्ता २ री च्या विद्यार्थ्याची वाचन स्पर्धा, इयत्ता ३ री ते ७ वी च्या विद्यार्थ्याची वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. तर वादविवाद स्पर्धेत “मेंदु पेक्षा सौंदर्य महत्वाचे आहे का ? ” इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यानी, व “कृत्रिम बुध्दिमत्ता वारसा हक्क धोकादायक आहे का ? ” इयत्ता ९ वी आणि ” राजकारण्यानी शिक्षित असावे का ? ” इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यानी आदी विषयावर सुंदररित्या वादविवाद सादर केला. एकुण सर्वच स्पर्धेचे चांगल्या पध्दतीने प्रदर्शन करून शाळेचे मुख्य संचालक स्व. अशोकजी खंडेलवाल यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी सहकार्य केले.