संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 23:- गावाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्यासाठी वाचनालयाची भूमिका मोलाची असते .स्वतःचे ज्ञान व अनुभव वृद्धिंगत करण्यासाठी काहीतरी वाचावेच लागते त्यामुळेच पुस्तके व ग्रंथाशी अगदी बालपणापासूनच प्रत्येकाचा संबंध येतो.बालपणी शालेय क्रमिक पुस्तके हातात असतात तर अवांतर ज्ञानसंपदणासाठी मग अन्य ग्रंथसंपदा मदतीला येते.एकूणच वाचन आवड व ग्रंथालये ही मानवी जीवनाची गरज म्हटले तर वावगे ठरणार नाही.असे मत जिल्हा प्रशासकीय अधिकारी गजानन कुरवाडे यांनी कामठी तालुक्यातील वडोदा येथील राधेश्याम गाड़बैल सार्वजनिक वाचनालयच्या तपासणी प्रसंगी व्यक्त केले.याप्रसंगी अधिकारी वर्गातील बाराहाते प्रामुख्याने उपस्थित होते
याप्रसंगी राधेश्याम गाड़बैल सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विशाल गाडबैल व अर्चना गाडबैल यांच्या हस्ते जिल्हा प्रशासकीय अधिकारी गजानन कुरवाडे यांना राजयोगी ग्रंथ देऊन सम्माणीत करण्यात आले.
वाचन आवड व ग्रंथालये ही मानवी जीवनाची गरज-जिल्हा प्रशासकीय अधिकारी गजानन कुरवाडे
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com