राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलची नवीन इमारत उभारण्यास सर्वतोपरी मदत करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 10 बेडच्या मॉड्यूलर अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गोरगरीबांच्या सेवेचा दिलेला संदेश शिरोधार्य मानत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पीटल गेल्या 50 वर्षापासून सेवारत आहे. अतिदक्षता विभाग सुरु झाल्याने रुग्णांना अधिक चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. या हॉस्पिटलची 250 बेड क्षमतेची प्रस्तावित नवीन इमारत उभारण्यास शासन सर्वोतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

कॅन्सर रिलिफ सोसायटी संचालीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ‘स्वर्गीय श्रीमती मीनाताई सिताराम जवादे’ यांच्या स्मृती प्रित्यर्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 10 बेडच्या मॉड्यूलर अतिदक्षता विभागाचे लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. कांचन वानरे, कॅन्सर रिलिफ सोसायटीचे सचिव डॉ. अनिल मालवीय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कॅन्सर रोगाचा उपचार बराच काळ चालतो व तो खर्चीकही असतो. तुकडोजी महाराजक कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. गेल्या 50 वर्षांपासून रुग्ण सेवेचा हा प्रवास गौरवास्पद आहे. याठिकाणी अतिदक्षता विभाग सुरु झाल्याने रुग्ण सेवेचे हे व्रत अधिक सक्षम रित्या पार पाडता येणार आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता या हॉस्पिटलची 250 बेड क्षमतेची नवीन इमारत उभारण्याचे प्रस्तावित आहे. या कामासही सुरुवात झाली आहे. नवीन इमारतची स्थिती बघून जिल्हाधिकारी यांनी रोड मॅप तयार करावा, अशी सूचना करत ही इमारत उभारण्यास राज्य, केंद्र शासनाच्या योजना व उपक्रमाद्वारे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. डॉ. अनिल मालवीय यांनी स्वागतपर भाषण केले.

तत्पूर्वी फडणवीस यांनी अतिदक्षता विभागाची पाहणी केली. अँटीमायक्रोबियल वॉल, सेंट्रलाइज मेडिकल गॅस पाईप लाईन, एअर फिल्टरिंग अँड कुलिंग सिस्टीम, बेडेड पॅनल आदी सुविधांनी हा अतिदक्षता विभाग सज्ज झाला आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) यांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधीतून (सिएसआयआर फंड) आणि राहुल सिताराम जवादे यांच्या सहकार्यातून स्व. श्रीमती मीनाताई सिताराम जवादे यांच्या नावाने हा 10 बेडचा अतिदक्षता विभाग उभारण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाघाच्या भुमीत संभाजी महाराजांचे पोस्ट तिकीट काढण्याचे सौभाग्य सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

Sat Mar 9 , 2024
– शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही अनावरण – ब्रेल लिपीमधील शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ आणि गोंड समुदाय पुस्तकाचे प्रकाशन  चंद्रपूर :- जगातील सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. अशा या वाघांच्या भुमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘छावा’ असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत टपाल तिकिटाचे अनावरण करणे, हे माझे सौभाग्य आहे, अशा शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!