नागपूर :- अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरच्या अखिल भारतीय नेटबॉल पुरुष संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य विधी विद्यापीठाच्या वतीने बेंगळुरू येथे ही स्पर्धा १४ फेब्रुवारी २०२३ ते १७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होत आहे. या अखिल भारतीय स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ रवाना झाला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नेटबॉल पुरुष संघामध्ये तोपेश सावरकर (एन.एम. डी. महाविद्यालय, गोंदिया), यश कापटे ( जी. एस. वाणिज्य महाविद्यालय, वर्धा), अभय वाघाडे (एन.एम. डी. महाविद्यालय, गोंदिया), ऋषिकेश कुबडे ( यशवंत महाविद्यालय, वर्धा), हर्षद मंदिये (एन.एम. डी. महाविद्यालय, गोंदिया), मोहित पटेल ( डीबीएम शारीरिक शिक्षण महाविद्यालय, गोंदिया), तुषार थांब्रे ( जी. एस. वाणिज्य महाविद्यालय, वर्धा), विकी बोपचे (शंकरलाल अग्रवाल महाविद्यालय, सालेकसा), सुमित यादव (श्री चक्रधर महाविद्यालय, सोनी), विकाल कुंभारे (सी. जे. पटेल कॉलेज, तिरोरा), साहिल पंचबुद्धे (आर्ट्स कॉमर्स अँड डिग्री, जवाहरनगर), देवमेष डोंगरवार ( एम. बी. पटेल महाविद्यालय, सालेकसा) आदी खेळाडूंची निवड करण्यात आली. तर राखीव खेळाडूंमध्ये संदीप पटले (शंकरलाल अग्रवाल महाविद्यालय, सालेकसा), चेतन कुकडे (आर्ट्स कॉमर्स अँड डिग्री, जवाहरनगर), प्रवीर बागडे (एन.एम. डी. महाविद्यालय, गोंदिया), सिगंबर बावणे (यशवंत महाविद्यालय, वर्धा) यांचा समावेश आहे.