संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या रणाळा ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने संपूर्ण गावातील केरकचरा ग्रा प च्या घंटा गाडीद्वारे संकलित करून अलंकार नगर समोरील स्मशानभूमी परिसरात टाकण्यात येते. ज्यामुळे हे परिसर अनधिकृत डम्पिंग यार्ड म्हणून अस्तित्वात आलेले आहे.या डम्पिंग यार्ड मध्ये दररोज टाकण्यात येणाऱ्या संकलित केर कचऱ्यातून निघणाऱ्या दुर्गंधीचा स्थानिक नागरीकांना नाहक त्रास भोगावा लागत असून नागरीकांना रोगराईचे निमंत्रण देत आहे.याबाबत स्थानिक नागरिकांच्या नाकीनऊ आल्याने संबंधित प्रशासनाकडे शासन दरबारी समस्या मार्गी लावण्याचा विषय मांडण्यात आला.मात्र ऐकणार कोण?सत्तेपुढे शहाणपण चालत नाही या म्हणीप्रमाणे नागरिकांच्या या त्रस्त मागणीला केराची टोपली दाखवून ग्रा प प्रशासनाचा मनमानी कारभार अजूनही सुरू आहे तर या केरकचऱ्यातुन प्लास्टिक खाणाऱ्या पशु जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहेत परिणामी ही अमानवीय परिस्थिती गुरांच्या मृत्यूस निमंत्रक ठरत आहे तर या मुक्या जनावरांना आपली व्यथा सांगता येत नसल्याने ग्रा प प्रशासन नागरिकांसह पशु जनावरांच्या जीवावर बेतल्याचे दिसून येते.
सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्या नंतरही 40 मोयक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागासह रणाळ्यात राजरोस वापर सुरू आहे.यामुळे कचरा व्यवस्थापणात अडचणी येतात .प्लास्टिक मधील विघटन न होणाऱ्या रसायनामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे शिवाय रनाळा च्या अनधिकृत डम्पिंग यार्ड मधील केरकचऱ्यातील प्लास्टिक च्या पिशव्या खाल्यामुळे जनावरांना मृत्यू ओढवत आहे .यासंदर्भात रणाळा ग्रा प प्रशासन गंभीर नसल्याने येथील पर्यावरणासह सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तर गुरांना मृत्यूचे राजरोस निमंत्रण मिळत आहे तरीसुद्धा याकडे वरिष्ठ लक्ष देत नसल्याची शोकांतिका आहे.