जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषात दुमदुमली रामटेक नगरी …..
रामटेक :- राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती निम्मित रामटेक शहरात ठीक ठिकाणी शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
गांधी चौक रामटेक येथे रामराज्य ढोल ताशा पथक ने राजे शिव छत्रपतीना मानवंदना दिली.
यावेळी रामटेकरांची गर्दी बघावयास मिळाली…
शहरात , लहान मुले तरुण तरुणी , छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता , मावळे यांच्या वेशभूषेत दिसून आले. शिवजयंती पर्वावर नागरिकांत जोरदार उत्साह होता.
अनेक संस्था तरफे ठीक ठिकाणी महा प्रशादाचे आयोजन करण्यात आले होते.