चंद्रपूर – मागील महिनाभरापासून मालमत्ता कर वसुली मोहीम सुरु असून, वारंवार संपर्क करूनही थकीत कराचा भरणा न करणाऱ्या रामाळा तलाव परिसरातील २ थकबाकीदारांचे गाळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या पथकाने सील केले. ही कारवाई ११ फेब्रुवारी रोजी करण्यात आली.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना १०० टक्के शास्तीत माफी देण्यात येत आहे. १० जानेवारीपासून ही योजना सुरु असून, १५ फेब्रुवारी रोजी शेवटची मुदत आहे. वसुलीचे लक्ष्य वाढविण्यासाठी सर्व पथक प्रमुखानी मालमत्ताधारकाशी संपर्क सुरु केले आहेत. मात्र, वारंवार संपर्क करूनही व्यावसायिक मालमत्ता कर न भरणाऱ्या गाळेधारकांचे गाळे सील करण्याची कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी रामाळा तलाव येथे दोन बंद दुकानगाळे सील करण्यात आले. थकबाकीदारात गाळा क्रमांक 1313/8 चे राहुल रमेशराव गुरनुले यांच्याकडे 1 लाख 14 हजार 148 आणि गाळा क्रमांक 1313/9 चे श्रीमती नीता गौतम नागदेवते यांच्याकडे 1 लाख 14 हजार 148 थकबाकी आहे. ही कारवाई मनपाचे कर विभाग प्रमुख श्री. सुरेश माळवे, पथक प्रमुख श्री. चैतन्य चोरे, बाजार लिपिक श्री. लक्ष्मण आत्राम, श्री. मयूर मलिक, श्री. गोपाल संतोषवार उपस्थित होते.