दिव्यांगानां दर महीना पाच हजार ₹ अनुदान दया, दिव्यांगांचे तहसीलदारांना निवेदन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- दिवसेंदिवस महागाई वाढत असून दिव्यांगांचे जगणे असहय होत आहे सध्या शासनाद्वारे दिव्यांगाना एक हजार ₹ मासिक अनुदान देण्यात येते या तुटपूंज्या अनुदानात संसाराचा गाड़ा चालविणे अशक्य आहे, त्यामुळे शासनाने दिव्यांगाना मासिक पाच हजार ₹ अनुदान दयावे अश्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्फत आज गुरुवारी (20 ऑकटोबर ) ला दुपारी देण्यात आले

आत्मनिर्भर दिव्यांग वेलफेयर सोसायटी चे मार्गदर्शक उज्ज्वल रायबोले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे दिव्यांगां चे अनुदान दर महिन्यात 5 तारखेपर्यंत अदा करावे, बैंक-तहसील कार्यालय आणि कोषागार दरम्यान समन्वय ठेवावा, शासकीय कार्यालयात दिव्यांगांसाठी रैंप बनवावे आणि दिव्यांगांना शासकीय कार्यालयात सनमानाची वागणुक दयावी या प्रमुख मागण्या केल्या.

दिव्यांगांच्या शिष्टमंडळात विजय फुले, अरुण पौनिकर, सुनिल हजारे, परमानंद मेश्राम, सुभाष राऊत, अशोक चव्हान, अरुण मानवटकर, धिरज वंजारी, गणेश सायरे, सुशिला हजारे,सिमा पानतावणे,वृदां राऊत, शौकत अली, वसिम हैदरी, शेख अशफाक, गजानन दोरसेटवार, प्रफुल ऊके यांचा समावेश होता

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com